बुद्धीची देवता असलेल्या गणेशाची मूर्ती घरी आणताना ताम्हण आणि रुमाल सोबत घेऊन जावे.
गणपती घरी घेऊन येताना तो नेहमी झाकून आणावा आणि गणेशाचे तोंड आपल्याकडे करावे.
मूर्ती घरी आणल्यावर ती दारात असतानाच दाराबाहेर मूर्तीवरून तांदूळ आणि पाणी ओवाळून बाहेर टाकून द्यावे.
ज्या व्यक्तीने गणपती घरी आणला आहे त्याच्या पायांवर पाणी, दूध आणि पुन्हा गरम पाणी ओतावे.
गणपती आणणाऱ्या व्यक्तीला कुंकू लावून सुवासिनींनी त्यांचे औक्षण करावे.
गणपती घरात आणल्यावर सुवासिनींनी प्रथम त्याचे औक्षण करावे.
गणपती घरात आणून पाटावर तांदूळ पसरुन घ्यावा. त्यानंतरच मूर्ती त्यावर ठेवावी.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.