Diwali Padva : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याला का आहे अधिक महत्त्व

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
Diwali Padva
Diwali PadvaSaam Tv
Published On

Diwali Padva : दिवाळी हा सणांचा राजा. या दिवसाला दीपोत्सव म्हणूनही ओळखले जाते. हा सण अवघ्या पाच दिवसांचा असतो. याची सुरुवात गोवत्सद्वादशी अर्थात गायीच्या पूजनाने होते.

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज हे सण देखील यात साजरे केले जातात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दिवाळी (Diwali) पाडवा अर्थात बलिप्रतिपदा. यंदा हा पाडवा २६ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

या दिवशी व्यापारी वर्ग लक्ष्मी व कुबेराची मनोभावे पूजा करतात तसेच वही पूजनाला देखील अधिक महत्त्व दिले जाते. (Latest Marathi News)

Diwali Padva
Govardhan Puja 2022 : गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे ? जाणून घ्या; पद्धत, महत्त्व आणि कथा

व्यापारीवर्गासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी वहीपूजन व वहीलेखनासाठी मुहूर्त...

शुक्रवार (ता. ०५) नोव्हेंबर २०२१ रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी ६:४२ ते ८:०७ चल, सकाळी ८:०८ ते ९:३२ लाभ, सकाळी ९:३३ ते १०:५७ अमृत, दुपारी १२:२२ ते १:४७ शुभ आणि सायं. ४:३७ ते ६:०२ चल चौघडीमध्ये दिवाळी पाडव्याचे वहीपूजन व लेखन करावे.

दिवाळी पाडवा

दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.

Diwali Padva
Diwali 2022 : दिवाळीत उरलेल्या मिठाईचा असा करा वापर

बलिप्रतिपदेला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) या दिवशी स्त्रिया पतीला व माहेरच्या आणि सासरच्या इतर पुरुषांना ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com