ज्योतिष्यशास्त्रानुसार, बुध ग्रह उद्या संक्रमण करणार आहे. त्यामुळे १२ राशाींपैकी ५ राशींचं नशीब चमकणार आहे. बुधचं एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं हे अनेक राशींना फलदायी असणार आहे. बुध सध्या वृषभ राशीत विराजमान असून तेथून ते आता मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह १४ जून रोजी रात्री ११.९ वाजता आपली राशी बदलेल. बुध वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करेल. हा ग्रह सुमारे १५ दिवस मिथुन राशीत राहील. २९ जून २०२४ पर्यंत बुध मिथुन राशीत राहील. या दरम्यान ५ राशींवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
मेष राशी
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे मेष राशीवर मोठा प्रभाव पडणार आहे. या राशीमधील काही लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. तर नोकरी करणाऱ्यांना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचा पैसा कोणाकडे अडकला असेल त्यांना त्यांचा पैसा परत मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी
बुध मिथुन राशीत प्रवेश करत असल्याने आर्थिक परिस्थितीत आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कामात प्रगती होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांनादेखील या संक्रमणाचा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांचा सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. बुधाच्या संक्रमणाने या राशीतील अनेकांची आर्थिक स्थिती सुधारेल. तर काहींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तर काहीजण त्यांच्या कामामुळे लोकप्रिय होतील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत अनेकांना फायदा होईल. तर काहींची परदेश दौऱ्यावर जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. तर काहींची समाजात संपत्ती आणि मान-सन्मान वाढेल.
धनू राशी
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे धनू राशीच्या लोकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर या राशीमधील काही लोकांचा समाजात मान वाढेल. तसेच नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसुद्धा हा काळ चांगला असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.