Budh Guru Yuti 2024 : मेष राशीत बुध-गुरुच्या युतीचा समावेश! या ५ राशी ठरतील लकी, मिळेल गुड न्युज

Budh Guru Yuti Horoscope : मेष राशीत बुध आणि गुरु युतीचा शुभ संयोग होणार आहे. २६ मार्चला बुध मेष राशीत प्रवेश करेल.
Budh Guru Yuti 2024, Budh Guru Yuti Horoscope
Budh Guru Yuti 2024, Budh Guru Yuti Horoscope Saam Tv

Budh Guru Yuti In Mesh Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार दिशा बदलत असतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे त्याचा अनेक राशींवर त्याचा परिणामही पाहायला मिळतो. मेष राशीत बुध आणि गुरु युतीचा शुभ संयोग होणार आहे.

२६ मार्चला बुध मेष राशीत प्रवेश करेल. होळीच्या दिवशी वृद्धी योग, बुधादित्य राजयोगासह ४ शुभ योग तयार होत आहे. मेष आणि सिंह राशीसह ५ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लकी ठरणार आहे. तसेच या राशीच्या लोकांना करिअरमध्ये (Career) यश आणि प्रगती मिळेल. कोणत्या राशींना फायदा (Benefits) होणार आहे जाणून घेऊया सविस्तर

1. मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अधिक भाग्यवान असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ मिळतील. कुटुंबासोबत (Family) आनंदाने वेळ घालवाल.

Budh Guru Yuti 2024, Budh Guru Yuti Horoscope
Holi 2024 : होळीला भद्राचं सावट! होलिका दहन करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी?

2. सिंह

या आठवड्यात अनेक कामे पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तीची मदत मिळेल. कामाचे कौतुक होईल. आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

3. कन्या

अनेक सकारात्मक बदल घडतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. नोकरदार लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नाचे स्त्रोत तयार केले जातील. परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल.

Budh Guru Yuti 2024, Budh Guru Yuti Horoscope
Holi 2024 Puja, Muhurt: होळी पूजनचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या तिथी आणि पूजा पद्धत

4. धनु

मित्राच्या मदतीने सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. या आठवड्यात पालकांना त्यांच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

5. मकर

करिअर आणि बिझनेसच्या समस्या कमी होतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली असेल. अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com