Railway Recruitment: १०वी, १२वी पास तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Railway Recruitment 2024: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. १०वी आणि १२वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती सेल अंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूरमध्ये येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. लेव्हल-१ आणि लेव्हल २ पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

रेल्वे भरती सेलमध्ये अर्ज करण्याची सुरुवात २७ जुलै २०२४पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०२४ असणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

रेल्वेमध्ये १२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. स्काउट्स आणि गाइड्स लेव्हल १ आणि लेव्हल २ पदांसाठी भरती केली जाणार आहे. लेव्हल १ पदासाठी उमेदवाराने १० वी पास असणे आवश्यक आहे तसेच ITI (NAC Approved NCVT) उत्तीर्ण झालेले असावे. लेव्हल २ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे आवश्यक आहे.

Railway Recruitment
Government Job: दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

रेल्वेमधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज फी ५०० रुपये असणार आहे.

Railway Recruitment
Kokan Railway Recruitment: कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी; १९० जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com