Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Railway Recruitment 2024 Application Process: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहे. जवळपास २४०० हून अधिक जागांसाठी भरती सुरु आहे.
Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये १० वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये २४०० हून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीबाबत अधिसूचना रेल्वे भरती विभागाने अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी rrccr.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती २०२४ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरु झाले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. अर्ज केल्यानंतर तुमची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर निकाल सांगितला जाईल.

Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Government Job: परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी अन् २४ लाख रुपयांचे पॅकेज; या विभागात सुरु आहे भरती

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १० वी पास असणे गरजेचे आहे. याशिवाय नॅशनल काउन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट काउन्सिल व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

पात्र उमेदवाराचे वय २४ वर्ष असणे गरजेचे आहे. SC/ST उमेदवारांना वात ५ वर्षाची सूट दिली जाईल. दिव्यांग व्यक्तींना वयात १० वर्षे सूट दिली जाईल. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये फी भरावी लागेल. याशिवाय SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी rrccr.com मध्य प्रदेशच्या अधिकृत वेबसाइटवर जा.त्यानंतर ऑनलाइन अर्ज या लिंकवर क्लिक करा. फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा. यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा. यानंतर अर्जाची फी भरा. फॉर्म सबमिट करुन त्याची प्रिंटआउट डाउनलोड करा.

Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI Recruitment: तरुणांना बँकर होण्याची सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

उमेदवारांची निवड १० वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती चेक करा.

Railway Bharti 2024: रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Zilla Parishad Recruitment: १२ वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी;जिल्हा परिषदेत या पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com