PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता १२वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Pune Municipal Corporation Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंघी तुमच्याकडे आहे. पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
PMC Recruitment
PMC RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत समाज विकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी, डिप्लोमा आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात समाज विकास विभाग व पुणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation Recruitment)

PMC Recruitment
Bank Jobs: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कुठे अन् कसा करावा?

पुणे महानगरपालिका आणि समाज विकास विभागाद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. विविध पदे भरती केली जाणार आहे. १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.डिजिटल फोटोग्राफी इन्स्ट्रक्टर, वायरिंग, मोटर रिवाइंडिंग, फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षण, मोबाईल रिपेअर इंस्ट्रक्टर, भरतकाम प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. (Government Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १२ वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. याचसोबत उमेदवाराला १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. त्याचसोबत टायपिंग प्रशिक्षण, इंग्रजी भाषा ट्रान्सलेशन प्रशिक्षक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

PMC Recruitment
NABARD Job: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; स्पेशलिस्ट पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

पुणे महानगरपालिकेअंतर्गत समाज विकास विभागात २९ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती सहा महिन्यांकरिता करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज त्याचसोबत पासपोर्ट साइज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता दाखला आणि इतर कागदपत्रे हे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण पुणे येथे पाठवायचा आहे. २ जानेवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावेत.

PMC Recruitment
Digital India Job: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता पदवीधर;अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com