
बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पंजाब नॅशनल बँकेत सध्या भरती सुरु आहे. पंजाब नॅशनल बँकेत इंटरनल ओम्बड्समॅन पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पंजाब नॅशनल बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्ही २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. (PNB Recruitment)
पंजाब नॅशनल बँकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ पेक्षा कमी असावी. याचसोबत कर्मचारी हा इतर बँकेतून रिटायर्ड किंवा कार्यरत इसावा. बँकेत जनरल मॅनेजर, फायनान्शियल सेक्टर या विभागात मॅनेजर असावे. याचसोबत उमेदवाराला बँकेत कामाचा किंवा इतर फायनान्स सेक्टरमध्ये ७ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. (Punjab National Bank Recruitment)
या नोकरीसाठी उमेदवारांना ३ वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट कालावधी असणार आहे. यानंतर तुमच्या कामाचा कार्यकाळ वाढू शकतो.या नोकरीसाठी तुम्हाला १.७५ लाख रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला २००० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अंगणवाडीत भरती
सध्या अंगणवाडीमध्ये भरती सुरु झाली आहे. अंगणवाडीत मदतनीस पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी उमेदवारांनी १२वी पास असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.