
अमर घटारे, साम टीव्ही
अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं. आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे. याचदरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे ४ मागण्या केल्या आहेत. सरकारने ४ मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम करणार नाही, असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. तसेच ३ मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेरणार असल्याचाही इशारा संघटनेने दिला आहे.
अमरावती अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला. यावेळी महिला बालकल्याण कार्यालयासमोरील रस्ता महिलांनी अडवला. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करणार नाही. लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविका बहिष्कार घातलील, असा इशारा सेविकांनी दिला.
अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या सर्व्हेचे प्रति फ्रॉम 50 रुपये देण्याची मागणी केली आहे. अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी दर्जा आणि ग्रॅच्युटी देण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व भत्ते वेळेवर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी, अशीही त्यांची मागणी आहे. यावेळी सरकारविरोधात अंगणवाडी सेविकांनी आक्रमक घोषणाबाजी केली.
'अमरावती जिल्ह्यातील या महिला आहेत. त्यांच्या प्रामुख्याने चार मागण्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटी देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी. ही आमची मागणी आहे. राज्य सरकारने मागच्या ६३ दिवसांच्या संपावेळी पेन्शन, म्हातारपणी दरमहा पेन्शन देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. आम्हाला रजा, आजारपणाच्या रजा, दरमहा पेन्शन दिल्या पाहिजे. यासाठी मोर्चा आहे. मागणी पंधरवडा आम्ही साजरा करत आहोत, असे अंगणवाडी सेविकांच्या नेत्याने सांगतिलं.
'आम्हाला दिलेले आश्वासन पाळलं नाही तर ३ मार्च रोजी विधानसभेला घेरल्याशिवाय राहणार नाही. संपू्र्ण महाराष्ट्रातील १ लाख अंगणवाडी सेविका तिथे जमतील. त्यांनी ३ हजार रुपयांची वाढ केली. पण २ हजार रुपयांची वाढ अद्याप दिली नाही. लाडकी बहीण योजनेचं फॉर्म रद्द करण्याचं षडयंत्र करतंय, ते अंगणवाडी सेविका करणार नाही, असेही नेत्याने सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.