PFRDA Recruitment
PFRDA RecruitmentSaam Tv

PFRDA Recruitment: सरकारी नोकरीची संधी; PFRDA मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

PFRDA Recruitment 2025: सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. PFRDA मध्ये सध्या ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Published on

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी विभागात नोकरीची ही उत्तम संधी आहे. PFRDA ने ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत त्यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसठी निवड झाल्यास तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

PFRDA ने ऑफिसर ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट pfrda.org.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

PFRDA Recruitment
Government Job: खुशखबर! परराष्ट्र मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

ऑफिसर ग्रेड ए पदासाठी एकूण ४० जागा भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता (Eligibility)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पेपर १, पेपर २ आधारे केली जाणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाईल. दोन्ही परीक्षा १०० गुणांच्या असणार आहे. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगदेखील असणार आहे.

PFRDA Recruitment
Indian Navy Recruitment: १०वी पास तरुणांना नौदलात नोकरीची संधी; अग्नीवीर पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला फीदेखील भरायची आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये फी भरावी लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाहीये. त्यामुळे सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

PFRDA Recruitment
Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com