Indian Navy Recruitment
Indian Navy RecruitmentSaam Tv

Indian Navy Recruitment: १०वी पास तरुणांना नौदलात नोकरीची संधी; अग्नीवीर पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Indian Navy Agniveer Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. अग्नीवीर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on

अनेकांचे हवाई दलात काम करण्याचे स्वप्न असते. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर एमआर म्यूजिशियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Indian Navy Agniveer Recruitment)

Indian Navy Recruitment
SAIL Recruitment: सरकारी नोकरीची संधी, SAIL मध्ये भरती; पगार १,८०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

इंडियन नेव्हीमधील या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया अजून सुरु झालेली नाही. ५ जुलै २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२५ आहे.

अग्नीवीर पदासाठी पात्रता (Agniveer Eligibility)

इंडियन नेव्हीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असावे. याचसोबत स्कूल एज्युकेशनद्वारा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. फक्त अविवाहित महिला आणि पुरुष या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अग्नीवीर पदाची भरती ४ वर्षांसाठी होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला लग्न करता येणार नाहीये.

या नोकरीसाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रतेसोबतच संगीताची आवड असणे गरजेचे आहे. त्यांना लय, सूर आणि गाण्याचे ज्ञान असावे. त्यांना कोणतेतरी वाद्य वाजवता येणे गरजेचे आहे. किबोर्ड, स्ट्रिंग, विंग इन्स्ट्रुमेंट, ड्रम किट याचे ज्ञान असावे.

Indian Navy Recruitment
Union Bank Job: युनियन बँकेत नोकरीची संधी, मिळणार भरघोस पगार, अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मॅट्रिक परिक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर फिटनेस टेस्ट, संगीत क्षमता टेस्ट आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीये.

Indian Navy Recruitment
Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com