NIA Bharti 2024 : राष्ट्रीय तपास यंत्रणेमध्ये पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; पगार ऐकून थक्क व्हाल..

Jobs News: सध्या प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. त्यात जर सरकारी नोकरी असेल तर त्यासाठी अनेकदा जागा कमी आणि उमेदवार जास्त असतात. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर या बातमी तुमच्यासाठीच.
Jobs News
NIA Bharti 2024Saam Tv
Published On

सरकारी नोकरी हवी अशी प्रत्येक तरुणांची इच्छा असते. जर त्यातील तुम्ही आहात,तर तुम्ही NIA मध्ये असलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून शेवटची तारीख निघण्यासाठी अजून काही दिवसांचा वेळ आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रत आहे शिवाय या रिक्त जागांसाठी अर्ज जागांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी फॉर्म भरु शकता. सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही खालील माहिती पाहा.

Jobs News
IBPS Clerk Job Vacancy : तरुणांसाठी खुशखबर ! बँकेत लिपिक पदांसाठी 4045 जागा रिक्त, कसा कराल अर्ज

या वेबसाइटवरुन करा अर्ज

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या या निघालेल्या भरती प्रक्रियेव्दारे निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या एकूण ११४ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज तुम्ही फक्त ऑनलाइन करु शकता. संपूर्ण अर्ज आणि माहितीसाठी तुम्हाला 'NIA' च्या 'nia.gov.in' अधिकृत वेबसाइटवर(website) जाऊ शकता.

शेवटची तारीख

राष्ट्रीय तपास संस्थेच्या असलेल्या पदांसाठी १४ जून २०२४ पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. ११४ या रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यापैंकी ५० पदे हे निरीक्षकांची तर उर्वरिक ६४ पदे उपनिरीक्षकांची आहेत.

कोणाला अर्ज करता येईल

या पदांसाठी अर्ज( application )करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे उमेदवारांना आवश्यक आहे शिवाय उमेदवारांनी या क्षेत्रातील किमान कामाचा २ वर्षांचा अनुभव असावा. महत्त्वाचे म्हणजे या पदांसाठी कमीत कमी ६५ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकता.

या पदांसाठी निवड कशी होईल...?

NIA मधील असलेल्या या पदांसाठी ऑफलाईन (Offline)देखील अर्ज भरावा लागेल. शिवाय ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर , अर्जासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडावी लागतील आणी खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील. महत्त्वाचे म्हणजे या पदांसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज ऑफलाइन पद्दतीने पोहोचले पाहिजेत. पत्ता – 'एसपी (प्रशासन), जिल्हा मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड, नवी दिल्ली 11003 '.या पत्त्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता.

या पदांसाठी असलेला पगार

या ठरलेल्या पदांसाठी निवड झाल्यानंतर उमेदवांराचे वेतन ही निरीक्षक पदासाठीचे वेतन (Salary)३४,८०० रुपये प्रति महिना आहे तर उपनिरीक्षक पदासाठी वेतन ३५,४०० ते १.१२,४०० रुपये इतके आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती पाहू शकता.

Jobs News
#shorts Job for Son F soil | 80 टक्के नोकऱ्या भुमिपुत्रांसाठी - आदित्य ठाकरे | Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com