PSI Bharti: मोठी बातमी! ६१४ पीएसआयच्या जागांसाठी भरती निघाली, MPSC कडून जाहिरात, जाणून घ्या अटी-शर्ती

MPSC PSI Recruitment: एमपीएससीद्वारे पीएसआय पदाच्या भरतीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अनेकांचे सरकारी अधिकारी व्हायचे स्वप्न असते. जर तुम्हाला पीएसआय व्हायचे असेल तर तुम्ही वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचा.
MPSC PSI Recruitment
MPSC PSI RecruitmentSaam Tv
Published On

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत राज्यात ६१५ पदांसाठी पोलिस उपनिरिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली सधी आहे. याबाबत एमपीएससीद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पोलीस उपनिरिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

MPSC PSI Recruitment
SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार ९३००० रुपये पगार; पात्रता काय?

एमपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी व्हायचे असे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण या भरतीची वाट पाहत असतात. जर तुम्हालाही एमपीएससी परीक्षा देऊन पीएसआय म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही या परिक्षेसाठी अर्ज करु शकतात. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित, गट ब पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ३८,६०० ते १,२२८०० रुपये वेतन देण्यात येईल. त्यात अधिक महागाई भत्ता आणि देय इतर भत्ते देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. मागसवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

MPSC PSI Recruitment
Infosys -TCS Jobs : सुवर्णसंधी! इन्फोसीस टीसीएससह या आयटी कंपनीत बंपर भरती, ९ लाखांपर्यंत पगार; आताच करा अर्ज

एमपीएससी मुख्य परीक्षा ३०० गुणांसाठी घेण्यात येणार तर शारीरिक चाचणी १०० गुणांसाठी घेण्यात येणार आहे.पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे उमेदवाराला लेखी परीक्षेसाठी पात्र समजण्यात येईल.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे.

MPSC PSI Recruitment
ESIC Jobs : रेझ्युम आताच तयार करा, परीक्षाशिवाय सरकारी नोकरी, महिना ६७००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com