IAS Abdul Nasar : अनाथाश्रमात लहानाचा मोठा, आज IAS अधिकारी; UPSC परीक्षा न देता अब्दुल नासार मोठ्या पदावर कसे पोहचले?

IAS Abdul Nasar Success Story: मेहनत आणि कामात सातत्य ठेवलं की यश हे मिळतंच. असंच यश आयएएस अब्दुल नासर यांना मिळालं आहे. ते UPSC परीक्षा न देताच IAS अधिकारी बनले आहे.
IAS Abdul Nasar
IAS Abdul NasarSaam Tv
Published On

देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससीची परीक्षा देऊन देशसेवेसाठी सरकारी विभागात काम करता येते. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अब्दुल नासर हे यूपीएससी परीक्षा न देताच आयएएस ऑफिसर झाले आहेत. अब्दुल नासर हे अनाथाश्रमात लहानाचे मोठे झाले .

अब्दुल नासर हे केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते ५ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले होते. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते. याच खडतर परिस्थितीत अब्दुल आणि त्यांची भांवडं अनाथश्रमात राहत होते.अब्दुल यांची आई दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करायची. (IAS Abdul Nasar)

IAS Abdul Nasar
IAS Shraddha Gome: लंडनमधील नोकरीला रामराम, UPSC ची तयारी, पहिल्याच प्रयत्नात IAS; श्रद्धा गोमे यांची कहाणी एकदा वाचाच

अब्दुल यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. १३व्या वर्षापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी क्लीनर, हॉटेल सप्लायर, टेलीफोन ऑपरेटर ते पेपर वाटण्याचे काम केले आहे. पेपर देण्यासोबत त्यांनी लहान मुलांचे ट्यूशनदेखील घेतले. याचसोबत त्यांचा स्वतः चा अभ्यास सुरु होता. (Abdul Nasar Become IAS Officer Without UPSC Exam)

अब्दुल यांनी थलासेरी येथील एका सरकारी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. या स्पर्धा परीक्षेत ते पास झाले आणि आरोग्य विभागात सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. लहानपणापासून अनाथाश्रमात राहिल्याने त्यांना समाज कार्य करण्याची इच्छा होती. त्यांचे चांगले काम पाहून २००६ साली त्यांना डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली. (IAS Abdul Nasar)

IAS Abdul Nasar
IAS Himanshu Gupta: अपयश म्हणजे अंत नाही, परिस्थितीवर मात केली अन् चहावाल्याचा मुलगा IAS अधिकारी झाला; वाचा संघर्षमय कहाणी

मेहनत आणि कामात सातत्य ठेवल्याने आपण खूप मोठे होऊ शकतो. अब्दुल नासर यांनी आपल्या कामात असंच सातत्या ठेवलं. त्यांनी २०१५ मध्ये केरलमधील टॉप डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळाली. त्यानंतर त्यांचे प्रमोसन आयएएस पदावर करण्यात आले. (IAS Abdul Nasar Success Story)

IAS Abdul Nasar
Success Story: अवघ्या १३ वर्षांचा मुलगा कंपनीचा CEO; वाचा भारतातील बुद्धीमान पठ्ठ्याची कहाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com