ISRO Recruitment
ISRO RecruitmentSaam Tv

ISRO Recruitment: खुशखबर! इस्त्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

ISRO Recruitment 2025: इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इस्त्रोमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना भरघोस पगारदेखील मिळणार आहे.
Published on

नोकरी शोधत असाल तर ही माहिती नक्की वाचा.सध्या इस्त्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशातील अंतरिक्ष संस्था इस्त्रोने ही भरती जाहीर केली आहे. जर तुम्हालाही इस्त्रोसारख्या संस्थेत काम करायचे असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शास्त्रज्ञ/इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे.

ISRO Recruitment
NTPC Recruitment: एनटीपीसीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; १८२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

इस्त्रोमधील (ISRO Recruitment) या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २९ एप्रिल २०२५पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही www.isro.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

इस्त्रोमधील या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती ६३ पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पदासाठी २२ जागा रिक्त आहे. मेकॅनिकल पदासाठी ३३ जागा तर कॉम्प्युटर सायन्स पदासाठी ८ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना Scientist/Engineer 'SC' पदावर नियुक्त केले जाणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये BE/BTech डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराकडे GATE स्कोर असणे गरजेचे आहे.

इस्त्रोमधील या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

ISRO Recruitment
IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; १७७० पदांसाठी निघाली भरती; अर्ज कसा अन् कुठे करायचा?

इस्त्रोमधील नोकरीसाठी अर्ज कसा करावा? (ISRO Recruitment Application Process)

सर्वप्रथम उमेदवारांना ISRO च्या अधिकृत वेबसाइटवर www.isro.gov.in जावे लागेल.

यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा आणि माहिती भरा.

यानंतर तुम्हाला अर्जशुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागेल. याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

ISRO Recruitment
Delhi Metro Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार दिल्ली मेट्रोत नोकरी; पगार ६०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com