IMD Recruitment
IMD RecruitmentSaam Tv

IMD Recruitment: हवामान खात्यात नोकरीची संधी; पगार ६३००० रुपये; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

IMD Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामान खात्यात सध्या भरती सुरु आहे.
Published on

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही जर सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारतीय हवामान खात्यात सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय हवामान खात्यातील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.केंद्र सरकारअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. (Government job)

IMD Recruitment
Government Job: सरकारी नोकरी अन् ८०,००० रुपये पगार; भारतीय खाद्य निगममध्ये बंपर भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

भारतीय हवामान खात्यात स्टेनोग्राफर ग्रेड I,डिविजन क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनोग्राफर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पालक संवर्ग किंवा इतर विभागात काम केलेले असावे. तसेच उमेदवाराला दहा वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा.

डिविजन क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पालक संवर्ग किंवा इतर विभागात काम केलेले असावे. स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मोटार कार किंवा जड वाहने चालवण्याचा अनुभव असायला हवा. (IMD Recruitment 2024)

IMD Recruitment
IDBI Bank Job: IDBI बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी, तब्बल ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

भारतीय हवामान खात्यात ६८ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर मिळेल.हा अर्ज भरुन तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. त्याचसोबत आवश्यक कागदपत्रेदेखील पाठवायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही ८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात. तुम्ही प्रशासकीय अधिकारी II (रिक्रूटमेंट सेल), हवामानशास्त्र महासंचालक, मौसम भवन, लोदी रोड, नवी दिल्ली ११०००३ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

IMD Recruitment
Government Job: सरकारी कंपनीत नोकरी अन् ५५००० रुपये पगार; या पदासाठी भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com