India Monsoon Update: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Monsoon Weather Update Late 4 June 2023: यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता.
Monsoon Update
Monsoon UpdateSAAM TV

Weather Update Monsoon: शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा नैर्ऋत्य मान्सून चार जून रोजी केरळमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जहीर केला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख एक जून असते. मात्र यंदा त्यातुलनेत तीन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात देखील मान्सून येण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे शेतीची कामे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमारच्या उत्तर-पश्चिमी किनाऱ्यावर धडकलं. त्यामुळे मान्सूनच्या वाटेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज व्यक्त हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला होता. त्यानंतर आता नैऋत्य मान्सून त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवसांनी उशीर होऊन 4 जून रोजी कमी अधिक 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले आहे. (Breaking News)

Monsoon Update
Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिपदाचे आमिष दाखवून ६ आमदारांना कोट्यवधींचा गंडा; राजकीय वर्तुळात खळबळ

यंदा सरासरीएवढाच पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये मान्सूनचे उशिरा होणारे आगमन हा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’ची स्थिती हिंदी महासागरातील द्विध्रुव परिस्थिती आणि उत्तर गोलार्धात बर्फाचे आच्छादन कमी होण्याची शक्यता यांसारख्या कारणांमुळे यंदाच्या र्नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com