ITBP Job: ITBP मध्ये नोकरी अन् ८१०००० रुपये पगार; पात्रता १०वी, १२वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

ITBP Recruitment 2024: इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती सुरु आहे.
ITBP Recruitment
ITBP RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डरमध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी भरती सुरु आहे. १०वी, १२वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (ITBP Recruitment)

ITBP Recruitment
Mumbai Metro Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार मुंबई मेट्रोत नोकरी; पगार २ लाख रुपये ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ITBP मधील नोकरीबाबत सविस्तर माहिती recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइवर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (ITBP Job News)

आयटीबीपीमध्ये ५१ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराने १२ वी पास असणे गरजेचे आहे. तसेच मोटर मशीनमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. तर कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

ITBP Recruitment
Bank Jobs: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कुठे अन् कसा करावा?

या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. याचसोबत शारीरिक अटदेखील ठेवण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी लेवल ४ नुसार २५,५०० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन अर्ज करावा. या नोकरीसाठी तुम्हाला १०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.

ITBP Recruitment
Indian Oil Job: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com