
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कर्मचारी राज्य विमा निगममध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
कर्मचारी राज्य विमा निगममधील नोकरीबाबत esic.gov.in या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. (ESIC Recruitment)
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये २८७ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जनरल मेडिसिनसाठी ४६ जागा रिक्त आहेत. जनरल सर्जरीसाठी ४० जागा रिक्त आहेत. कम्युनिटी मेडिसिन पदासाठी ३१ तर ओबीजीवाई पदासाठी २२ जागा रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने सबमिट करायचा आहे.
ईएसआयसीसाठी फॉर्म भरुन आवश्यक कागदपत्रांसह क्षेत्रीय निदेशक, ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, सेक्टर १६, फरीदाबा १२१००२ येथे पाठवायचा आहे. (ESIC Recruitment 2025)
ईएसआयसीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती वेगवेगळ्या विभागात केली जाणार आहे. यामधील काही पदांसाठी उमेदवारांनी मेडिकलमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत अनुभवदेखील असावा. तर काही पदांसाठी मास्टर ऑफि मेडिसिन किंवा मास्टर ऑफ सर्जरी पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे असावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.