Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; १००० पदांसाठी भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

Punjab and Sind Bank Recruitment 2026: पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २००० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Bank Job
Bank JobSaam Tv
Published On
Summary

पंजाब अँड सिंध बँकेत नोकरीची संधी

लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती

१००० पदांसाठी होणार भरता

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. पंजाब अँड सिंध बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

Bank Job
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी punjabandsind.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या भरती मोहिमेत १०० पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

पंजाब अँड सिंध बँकेतील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ मार्च २०२६ रोजी सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे, महाराष्ट्रात एकूण ६० पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या संधीचं सोनं करावं.

Bank Job
Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय 'हा' आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

पात्रता

पंजाब अँड सिंध बँकेतील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत कोणत्याही बँकेत कामाचा १८ महिन्यांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

निवडप्रक्रिया आणि पगार

पंजाब अँड सिंध बँकेत JMGS I ऑफिसर पदावर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्क्रिनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू आणि लोकल भाषा टेस्टद्वारे निवड होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ₹48480-₹85920 पगार मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Bank Job
Vastu Tips For Job: प्रमोशन आणि पगारात वाढ होत नाही? मग 'या' 5 टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com