DRDO Internship: खुशखबर! डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

DRDO Internship 2026: डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही जर शिकत असाल किंवा तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे.
DRDO Job
DRDO JobGoogle
Published On
Summary

DRDO मध्ये इंटर्नशिपची संधी

विविध पदांसाठी भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल अन् नोकरी शोधत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये इंटर्नशिप जाहीर केली आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी सर्वात आधी अधिसूचना वाचायची आहे.

डीआरडीओच्या डिफेंस इंजिनियरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीमध्ये इंटर्न पदासाठी भरती केली जात आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

DRDO Job
BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

डीआरडीओमध्ये ८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. जे विद्यार्थी सायन्स आणि रिसर्च फील्डमध्ये करिअर करण्याचा विचार करत आहेत. ज्यांना प्रॅक्टिकल काम करायचे आहे. त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.त्यांना चांगली ट्रेनिंगदेखील मिळणार आहे.

या इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंग/इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक एंड इंस्टूमेंटेशन/ एंबेडेड सिस्टम इंजीनियरिंग, मैकेनिकल, बायोमेडिकल इंजीनियिरंग/मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी, टेक्सटाइल इंजीनियरिंग/पॉलीमर साइंस, केमिस्ट्री, फिजिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचे आहे.

डीआरडीओमधील या नोकरीसाठी निवड झाल्याची माहिती १८ जून रोजी मिळणार आहे. ही इंटर्नशिप १ जुलै २०२६ रोजी सुरु होणार आहे. ६ महिन्यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिपसाठी डेबेल, डीआरडीओ, बंगळुरु येथे जावे लागणार आहे. या इंटर्नशिपसाठी ६ महिन्यांसाठी एकूण ३०००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

DRDO Job
High Income Job: शिक्षण कमी आहे म्हणून टेन्शन घेऊ नका! करा हे 5 कोर्स आणि मिळवा लाखोंचा पगार

अर्ज कोण कोण करु शकते?

जे विद्यार्थी सध्या इंजिनियरिंग किंवा सायन्समध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत.

फायनल इअरचे विद्यार्थीदेखील अर्ज करु शकतात.

अर्ज करताना तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. अन्यथा तुमचा फॉर्म नाकारला जाईल.

अर्ज कसा करावा?

तुम्हाला अधिसूचनेत लिहल्याप्रमाणे संपूर्ण अर्जाचा फॉर्म डिफेस बायो इंजिनियरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीज, एडीई कॅम्प्स, न्यू तिप्पसंद्रा, बंगळुरु ५६००७५ येथे पाठवायचा आहे.

DRDO Job
Government Job Rule : सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठा बदल, सरकारनं नेमका काय निर्णय घेतला? जाणून घ्या!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com