AAI Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Airport Authority of India Recruitment: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
AAI Recruitment 2024
AAI Recruitment 2024Saam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमचेही नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. एअरपोर्ट ऑथोरिटीमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे.

आयटीआय अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ही भरती करण्यात येणार १९७ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे.

AAI Recruitment 2024
Railway Job: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; तब्बल १७८५ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या भरतीमध्ये ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी nats.education.gov.in वर अर्ज करावेत. तसेच आयटीआय अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी apprenticeshipindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (Airprt Authority Of India Recruitment)

ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ४ वर्षाचा डिग्री कोर्स केलेला असावा. याचसोबत तीन वर्षाचा इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ITI/NCVT सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २६ वर्ष असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १५ हजार रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२ हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवाराला ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. (Airport Authority of India Job)

AAI Recruitment 2024
SBI Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये १९७ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि कागदपत्रे पडताळणीनंतर होणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना माहिती ई-मेलवर देण्यात येणार आहे.

AAI Recruitment 2024
Government Job: समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार १४२४०० रुपये; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com