Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEO

Lift Accident : आंध्र प्रदेशात सूर्या टॉवर्समध्ये लिफ्टमधून बाहेर पडताना महिला चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निष्काळजीपणामुळे की तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली याचा पोलिस तपास करत आहेत.
Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEO
Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEOmeta ai
Published On

लिफ्टने हत्या केलीये ... होय तुम्ही बरोबर वाचताय. लिफ्टसोबत केलेल्या छोट्याश्या मस्तीमुळे आंध्र प्रदेशात एका 52 वर्षीय महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे . ही घटना रविवारी सूर्या टॉवर्स या रेसिडेशियल टॉवरमध्ये घडली. लिफ्टमधून बाहेर येत असतानाच अचानक लिफ्ट सुरू होऊन खाली जाऊ लागली. महिला फ्लोर आणि लिफ्टच्या मधे चिरडली गेली.

हल्ली साधी लिफ्ट देखील जीवघेणी ठरत आहे. लिफ्टचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असे वारंवार सांगितले जाते. याकडे आपण सोईस्कर दुर्लक्ष करतो. लिफ्टशी मस्ती करण्याच्या प्रयत्नात आंध्र प्रदेशात 52 वर्षीय वनिताचा जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील सूर्या टॉवर्समध्ये ही घटना घडली. लिफ्टमधून वनिता, तिची मुलगी आणि नातू एका फ्लोरवर उतरत होते. पहिल्यांदा नातू बाहेर आला. मागून मुलगी बाहेर आली नंतर वनिता बाहेर पडणार इतक्यात लिफ्ट खालच्या फ्लोरसच्या दिशेने सरकली. घाईगडबडीने वनिताला काय करावे सुचेना म्हणून तिने लिफ्टच्या बाहेर पाय टाकला. लिफ्ट वेगाने खालच्या फ्लोरच्या दिशेने सरकली आणि त्याच क्षणी वनिताने पाय बाहेर टाकला. यासगळ्यात लिफ्ट आणि फ्लोरच्यामध्ये वनिता चिरडली, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEO
Kerala Crime : "बॉयफ्रेंडला iPhone घ्यायचा होता..." १३ वर्षांच्या नातीने आजोबांना संपवलं; पोलीसही चक्रावले

ही घटना इतक्या वेगाने घडली की जवळ असलेल्या मृत महिलेच्या मुलीला देखील काय करावे ते सुचले नाही. वनिता वेदनेने ओरडत होती. मदतीसाठी आवाज देत होती. आवाज ऐकताच टॉवर्समधील लोकांनी तातडीने लिफ्टकडे धाव घेतली. काही वेळाने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने वनिताला बाहेर काढण्यात यश आले. तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याने रक्तस्राव झाला. ती बेशुद्ध झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Andhra Pradesh : लिफ्टमधून बाहेर पडतानाच ५२ वर्षीय महिलेचा करुण अंत; काळजाचे ठोके चुकवणारी घटना, अंगावर काटा आणणारा VIDEO
Wardha Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा, महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; वर्धा हादरले

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, लिफ्टची सर्व आवश्यक सुरक्षा चाचणी आणि देखभाल तपासणी झाली होती का? की निष्काळजीपणामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला याचा पोलीस सखोल तपास करत आहे.

या घटनेचा सीसीटिव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मृत्यूविषयी दुखद भावना देखील व्यक्त केल्या जात आहेत याशिवाया काही लोकांनी तिच्या मुलीची चुकी असल्याच म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी संबंधित लिफ्टच्या सुरक्षेप्रकरणी निष्काळजीपणा केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या लिफ्ट वापरण्याबाबत अनेकांच्या मनात धास्ती बसली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com