Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू

Bihar Crime News: बिहारमध्ये २७ वर्षीय महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केली. विष प्राशन करून तिघींची आत्महत्या. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली. सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करण्यात आलेत.
Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू
Bihar Crime NewsSaam Tv
Published On

Summary:

  • बिहारमध्ये महिलेने दोन मुलींसह केली आत्महत्या

  • आधी मुलींनी विष पाजलं नंतर महिलेने स्वत:ही विष प्यायले

  • रुग्णालयात उपचारादरम्यान तिघींची मृत्यू झाला

  • मुलगा होत नसल्याने सासरचे महिलेचा छळ करत होते

बिहारमध्ये एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील जगन्नाथपूर गावात घडली. मुलगा होत नसल्यामुळे सासरची मंडळी या महिलेचा छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिने दोन चिमुकल्या निष्पाप मुलींना विष पाजून त्यांची हत्या केली त्यानंतर तिने देखील विष प्यायली. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.

Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू
Shocking: सॉरी मम्मी-पप्पा! ३ सख्ख्या बहिणींची आत्महत्या, मध्यरात्री ९ व्या मजल्यावरून मारल्या उड्या, कारण वाचून शॉक बसेल

आत्महत्या केलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. मुलगा झाला नाही म्हणून सासरचे लोक तिचा छळ करत होते. कविता कुमार (२७ वर्षे), सपना कुमारी (५ वर्षे) आणि गुंजन कुमारी (दीड वर्षे) अशी आत्महत्या केलेल्या महिला आणि तिच्या मुलींची नावं आहेत. कविताने आपल्या दोन्ही मुलींसोबत विष प्यायले. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू
Shocking: ३ सख्ख्या बहिणींच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, 'ती' डायरी सापडली; शेवटच्या पानातून सत्य उघड

कविताचे माहेर बिहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिगहा गावात होते. तिच्या आजोबांनी सांगितले की, गेल्या ६ दिवसांपासून कविताच्या सासरची लोकं तिला आणि त्चाय मुलींना जेवण देत नव्हते. ती आपल्या मुलींसह शेजारच्यांच्या घरी जेवण करत होती. १० वर्षांपूर्वी कविताचे पिंटू कुमारसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर तिला दोन मुली झाल्या. मंगळवारी तिच्या सासरच्या लोकांनी तिला आणि तिच्या मुलींना जबरदस्ती विष पाजलं. तब्येत खराब झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू
Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

कविता आणि तिच्या मुलींचा मृत्यू झाल्याचे कळताच तिच्या माहरेच्या लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करत आक्रोश केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची प्राथमिक माहिती दिली. तिघींचे मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या प्ररणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कविताच्या नातेवाईकांनी केली.

Shocking: मुलगा होत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, महिलेने दोन चिमुकलींसह विष प्यायलं; तिघींचा मृत्यू
Shocking : शिक्षिकेच्या प्रेमात विद्यार्थी झाला वेडापिसा, प्रपोज केला पण नकार दिला, रागात तिच्या ओठांवरून चाकू फिरवला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com