Kashish Chaudhary: कोण आहे २५ वर्षीय कशिश चौधरी? बनल्यात पाकिस्तानमधील पहिल्या हिंदू असिस्टंट कमिशनर

Kashish Chaudhary Become Pakistan First Hindu Assistant Commissioner: पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पहिल्यांदा एका हिंदु मुलीची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. कशिश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Kashish Chaudhary
Kashish ChaudharySaam Tv
Published On

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये एका हिंदू मुलीची सहाय्यक आयुक्त पदावर नियु्क्ती झाली आहे.एका हिंदू मुलीने हे यश मिळवून इतिहास रचला आहे. कशिश चौधरी या २५ वर्षीय मुलीने हा इतिहास रचला आहे. त्या आता बलुचिस्तानमध्ये पहिल्या हिंदू सहाय्यक आयुक्त बनल्या आहेत. त्यांची ही कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तेथील हिंदू महिलांच्या शिक्षणाबद्दल आणि कामगिरीबद्दलचा उत्तम संदेश आहे.

Kashish Chaudhary
Success Story: पहिल्या प्रयत्नात फेल, दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवली चौथी रँक; २३ व्या वर्षी IAS होणाऱ्या स्मिता सभरवाल आहेत तरी कोण?

एका रिपोर्टनुसार, कशिश चौधरी यांचा जन्म पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील चगाई जिल्ह्यातील नोशकी शहरात झाला. हा भाग खूप मागासलेला आणि दुर्गम आहे. तरीही कशिशने या परिस्थित तिथे अभ्यास केला. आणि शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.

कशिश चौधरी यांनी बलुचिस्तान लोकसेवा आयोग (BPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या आता सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतील. कशिश यांच्या या कामगिरीने त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

कशिश यांनी क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बगाती यांची भेट घेतली. यावेळी त्या महिला व अल्पसंख्यांकाच्या हक्कांसाठी आणि प्रांताच्या विकासासाठी काम करतील, असं सांगितलं. महिलांना सक्षम बनवणे आणि समान अधिकार देणे हे त्यांचे प्राधान्य असेल.

Kashish Chaudhary
Success Story: अमेरिकेतील नोकरी सोडली, घरी बनवून विकले पौष्टिक लाडू; आज कमावतो ५५ लाख रुपये; वाचा सक्सेस स्टोरी

कशिश यांचा प्रवास

कशिश यांचे वडील गिरधारी लाल यांचा त्यांच्या यशात खूप मोठा वाटा आहे. ते मध्यमवर्गीय व्यापारी आहेत.मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले.कशिश यांची ही कामगिरी पाकिस्तानमधील सर्व हिंदू महिलांसाठी मोलाची आहे.

Kashish Chaudhary
Success Story: वडिलांच्या स्वप्नासाठी ८-८ तास अभ्यास; UPSCत पहिली आली, इशिता किशोर यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com