GE Aerospace : जीई एरोस्‍पेस पुण्‍यात करणार २४० कोटींची गुंतवणूक; अत्‍याधुनिक इक्विपमेंट, उत्‍पादन वाढीला मिळणार प्रोत्साहन

GE Aerospace News : यूयॉर्क स्‍टॉक एक्‍स्‍चेंजवर सूचीबद्ध स्‍वतंत्र कंपनी म्‍हणून लाँच झाल्‍यानंतर जीई ऐरोस्‍पेसने पुण्‍यातील आपल्‍या उत्‍पादन प्‍लांटचा विस्‍तार व सुधारणा करण्‍यासाठी २४० कोटी रुपयांच्‍या (जवळपास ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
GE Aerospace
GE AerospaceSaam Digital

GE Aerospace

न्‍यूयॉर्क स्‍टॉक एक्‍स्‍चेंजवर सूचीबद्ध स्‍वतंत्र कंपनी म्‍हणून लाँच झाल्‍यानंतर जीई ऐरोस्‍पेसने पुण्‍यातील आपल्‍या उत्‍पादन प्‍लांटचा विस्‍तार व सुधारणा करण्‍यासाठी २४० कोटी रुपयांच्‍या (जवळपास ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या गुंतवणूकीमुळे उत्‍पादन प्‍लांटला सध्यस्थितीतील उत्‍पादनांची क्षमता वाढवण्‍यासह मशिन्‍स/इक्विपमेंट आणि विशेष टूल्‍स खरेदी करत नवीन प्रकल्‍प व उत्‍पादन प्रक्रियांची भर घालता येईल.

''पुण्‍यातील मल्‍टी-मोडल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग प्‍लांटमधील आमची टीमने ग्राहकांसाठी सुरक्षितता, दर्जा व डिलिव्‍हरीवर मुख्‍यत्‍वे लक्ष केंद्रित केले आहे. मला या प्‍लांटचे विस्‍तारीकरण पाहताना आनंद होत आहे, जे जागतिक स्‍तरावर एअरक्राफ्ट इंजिन कम्‍पोनण्‍ट्सच्‍या आमच्‍या पुरवठा साखळीमध्‍ये प्रबळ योगदानकर्ता ठरले आहे,'' असे जीई ऐरोस्‍पेस येथील ग्‍लोबल सप्‍लाय चेनचे उपाध्‍यक्ष माइक कॉफमन म्हणाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

''ही गुंतवणूक आम्‍हाला भारतातील ऐरोस्‍पेसमधील आमचा विकास सुरू ठेवण्‍यास मदत करते, तसेच ग्राहकांच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली संसाधने प्रदान करते,'' असे जीई ऐरोस्‍पेसच्‍या पुणे येथील प्‍लांटचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अमोल नागर म्‍हणाले.

GE Aerospace
Iran-Israel: आखणी दोन देश आले आमनेसामने; इस्रायल आणि इराणमध्ये कधीही होऊ शकतं युद्ध; जाणून घ्या कारण

फेब्रुवारी २०१५ मध्‍ये माननीय पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आलेली फॅक्‍टरी व्‍यावसायिक जेट इंजिन्‍ससाठी कम्‍पोनण्‍ट्स उत्‍पादित करते. हे कम्‍पोनण्‍ट्स जीईच्‍या जागतिक फॅक्‍टरींमध्‍ये पुरवठा केले जातात, जेथे ते जीई व सॅफ्रानचा संयुक्‍त उद्यम सीएफएमद्वारे जी९०, जीईएनएक्‍स, जगातील सर्वात शक्तिशाली व्‍यावसायिक जेट इंजिन जीई ९एक्‍स आणि लीप इंजिन्‍स असेम्‍बल करण्‍यासाठी वापरले जातात. हे प्‍लांट स्‍थानिक ऐरोस्‍पेस उत्‍पादन टॅलेंट विकसित करण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिले आहे, जेथे स्‍थापनेपासून विशेष ऐरोस्‍पेस अचूक उत्‍पादन प्रक्रियेमध्‍ये ५००० हून अधिक व्‍यक्‍तींना प्रशिक्षण दिले आहे.

ISO14001 व ISO45001 अंतर्गत प्रमाणित या प्‍लांटने समुदायामध्‍ये पर्यावरणीय सर्वोत्तम पद्धती व व्‍यवस्‍थापन निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, ३० टक्‍के ऊर्जा वापर नवीकरणीय स्रोतांमधून येतो. प्‍लांटमधून शून्‍य पाण्‍याचा विसर्ग होतो, दरवर्षाला १ कोटी लीटर पाण्‍याचा (१०० दशलक्ष लिटर) पुनर्वापर केला जातो आणि २० मेट्रिक टन प्‍लास्टिक रिसायकल केले जाते.

GE Aerospace
Lalu Prasad Yadav: ऐन लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, न्यायालयाने जारी केलं अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com