Iran-Israel: आखणी दोन देश आले आमनेसामने; इस्रायल आणि इराणमध्ये कधीही होऊ शकतं युद्ध; जाणून घ्या कारण

Iran-Israel Dispute : आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये इराण कॉन्सुलेट (वाणिज्य दूतावासा)वर हल्ला झाला होता. या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरण्यात आले होते. इराण आणि इस्रायलमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता आहे.
Iran-Israel
Iran-Israel Dispute yandex

Iran-Israel War iranian leader ayatollah khomeini warn :

मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झालाय. इस्रायल आणि हमास यांच्यात सहा महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा धोकाही वाढलाय. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करू शकतो. इस्रायलनेही तेच गृहीत धरले आहे, त्यामुळे त्यांनीही तयारी सुरू केली आहे. इस्रायलने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. याशिवाय राखीव सैनिकांनाही पाचारण करण्यात आले आहे. इतकंच नाही तर इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी तेल अवीवमध्ये पुन्हा आश्रयस्थान शेल्टर उघडण्यात येत असल्याचं स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

दोन्ही देशात युद्ध होण्याची सुरुवात सिरियाची राजधानी दमास्कस येथील इराणच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या हवाई हल्ल्याने झाली. हा हल्ला १ एप्रिल रोजी झाला होता. या हल्ल्यात १३ लोक मारले गेले, त्यापैकी ६ सीरियाचे नागरिक होते. ठार झालेल्यांमध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) मधील ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रझा जाहेदी यांचा समावेश आहे. ते IRGC च्या 'कुड्स फोर्स'चे महत्त्वाचे व्यक्ती होते. अल-जझीरानुसार, फेब्रुवारी २०२० मध्ये जनरल सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणच्या सर्वोच्च कमांडरचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिलीय. या हल्ल्याला तशाचप्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप होईल, असं खामेनी म्हणालेत.

दरम्यान या हल्ल्याबाबत इस्रायलने अद्याप अधिकृतपणे काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, एका इस्रायली कमांडरने सांगितले की, ही 'कुड्स फोर्स'ची इमारत आहे, जी इतर देशांमध्ये ऑपरेशन करते. ही इमारत वाणिज्य दूतावास किंवा दूतावास नव्हते. ती कुड्स फोर्सची इमारत होती, असं इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सीएनएनला सांगितले. पेंटागॉनच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी सबरीना सिंग यांच्या मते, हा हल्ला इस्रायलने केलाय, असं अमेरिकेला वाटत आहे.

इस्रायली गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमोस याडलिन यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, इराण या शुक्रवारी हल्ला करू शकतो. एकतर तो थेट लष्करी हल्ला करेल किंवा प्रॉक्सी युद्ध सुरू करेल. प्रॉक्सी युद्ध म्हणजे इराण समर्थित हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करू शकतात. हमाससोबतच्या युद्धातही हिजबुल्ला इस्रायलविरुद्ध लढत आहे. इराणने हल्ला केला तर नवल वाटणार नाही आणि घाबरण्याची गरज नाही.

इस्रायलचे हवाई संरक्षण अतिशय मजबूत असल्याचं याडलिनचे म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यासाठी इस्रायलचे सैन्यही सज्ज झाले आहे. सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय इस्रायलने अनेक महत्त्वाच्या भागात जीपीएस ब्लॉक केले आहेत. जीपीएस ब्लॉकिंगमुळे क्षेपणास्त्रे आणि ड्रोन भरकटत असतात.

वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. हे आंतरराष्ट्रीय करार आणि राजनैतिक नियमांचे उल्लंघन आहे. गाझामधील अपयशामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांनी केलीय. इराण या हल्ल्याचं उत्तर तशाच प्रकारे देईल, असं सीरियामधील इराणी राजदूत होसैन अबकारी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com