Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; जालन्यात मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Jalna News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रशांत कोरटकर चांगलाच अडचणीत सापडला आहे. राज्यभर शिवप्रेमींकडून आंदोलन केलं जात आहे दुसरीकडे कोरटकर पसार झाला
Prashant Koratkar
Prashant KoratkarSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावा, तसेच अटक करण्याच्या मागणीसाठी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 

प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना फोन करुन शिवीगाळ करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याचे पडसाद उमटत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने प्रशांत कोरटकर चांगलाच अडचणीत सापडला आहे. याविरोधात राज्यभर शिवप्रेमींकडून आंदोलन केलं जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कोरटकर पसार झाला आहे.

Prashant Koratkar
Taloba Online Booking Scam : ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळा; १३ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त, काय आहे नेमका घोटाळा?

देशद्राहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

फरार असलेल्या प्रशांत कोरटकर यास पोलिसांची तात्काळ अटक करावी तसेच कोरटकर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा व शिवप्रेमी संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. 

Prashant Koratkar
Water Crisis : पाणीटंचाईची तीव्रता वाढली; जायकवाडी धरण परिसरातील गावातच भीषणता

तर राज्यभरात रास्ता रोको करण्याचा इशारा 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com