WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; रिपोर्टमधून माहिती समोर
WhatsApp DownSaam Tv

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; काय आहेत प्रमुख कारणे?

WhatsApp Account Ban Update : : व्हॉट्सअॅपने मोठा खुलासा केला आहे. व्हॉट्सअॅप कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात एकूण ७ कोटी अकाउंट्सवर बंदी घातल्याची माहिती मासिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
Published on

मुंबई : व्हॉट्सअॅपने मोठा खुलासा केला आहे. व्हॉट्सअॅप कंपनीने भारतात गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात एकूण ७ कोटी अकाउंट्सवर बंदी घातल्याची माहिती मासिक अहवालातून दिली.

'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, मेटा कंपनी सध्या लोकसभा निवडणुकीदरम्यान फसवणूक आणि बेकायदेशीर टेलीमार्केटिंगच्या अहवालाची चौकशी करत आहे. माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत ही चौकशी सुरु आहे. कंपनीने मासिक अहवालातून या विषयाची माहिती जाहीर केली.

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; रिपोर्टमधून माहिती समोर
Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

'मासिक अहवाल हा माहिती तंत्रज्ञानाच्या नियमानुसार प्रसिद्ध केला जाते. या अहवालात व्हॉट्सअॅपने भारतात केलेल्या कारवाईची माहिती आहे. व्हॉट्सअॅपकडे भारतीय युजर्सकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. भारतीय कायदे आणि व्हॉट्सअॅपच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतात कारवाई केली आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅप कंपनीने दिली.

व्हॉट्सअॅपने मागील वर्षी १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान 7,954,000 अकाउंट्स बंद केले होते. कंपनीने मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत 69,307,254 अकाऊंट्स बंद केले होते.

मागील वर्षी कोणत्या महिन्यात किती अकाऊंट्स बंद करण्यात आले?

जानेवारी,२०२३ - 2,918,000

फेब्रुवारी २०२३ - 4,597,400

मार्च २०२३ - 4,715,906

एप्रिल २०२३ - 7,452,500

मे, २०२३ - 6,508,000

जून - २०२३ - 6,611,700

जुलै - २०२३ - 7,228,000

ऑगस्ट २०२३ - 7,420,748

सप्टेंबर २०२३ - 71,11,000

ऑक्टोबर २०२३ - 7,548,000

नोव्हेंबर - २०२३, 7,196,000

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; रिपोर्टमधून माहिती समोर
Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

दरम्यान, डिंसेबर महिन्याचाही डेटा समोर आल्यास ७ कोटींचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तर २ कोटी व्हॉट्सअॅप अकाउंट हे युजर्सकडून कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट येण्यापूर्वी बंद केल्याचे व्हॉट्सअॅपने अधोरेखित केले.

'कंपनीने काही अकाउंट्स बंद केल्याचे आकडे काही प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये चुकीचा वापर आणि युजर्सकडून आलेल्या नकारात्मक अभिप्रायानंतर काही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅपने दिली. व्हॉट्सअॅपला मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत ७९,००० तक्रारी युजर्सकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com