Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Covaxin is Safe Claims by Bharat Biotech : कोव्हिशिल्ड लस बनवणारी कंपनी AstraZeneca ने या वॅक्सीनचे साइड इफेक्ट होत असल्याचं कबुल केलं. त्यानंतर आता कोव्हॅक्सिन या कंपनीने देखील मोठा दावा केला आहे.
Covaxin
Covaxin SaamTv

कोरोना महामारीमध्ये भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस देण्यात येत होत्या. दोन्ही लस घेतल्यानंतर आता तीन वर्षांनी कोव्हिशिल्ड लस बनवणारी कंपनी AstraZeneca ने या वॅक्सीनचे साइडइफेक्ट होत असल्याचं कबुल केलं. त्यानंतर आता कोव्हॅक्सिन या कंपनीने देखील मोठा दावा केला आहे.

Covaxin
JN.१ Corona New Variant: काळजी घ्या, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, २४ तासात इतक्या रुग्णांची झाली नोंद

कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक या कंपनीने बनवली होती. कोव्हिशिल्डचा गोंधळ पाहून कोव्हॅक्सिन ही लस पूर्णता सुरक्षित असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. भारत बायोटेकने एक पत्रक जाहीर करत सोशल मीडियामार्फत ही माहिती दिली आहे.

कोव्हॅक्सिन लस बनवाताना आम्ही सर्वात आधी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला. कोव्हॅक्सिनसाठी परवाना मिळाल्यावर आम्ही तब्बल २७ हजारांहून अधिक व्यक्तींवर याची चाचणी करून पाहिली, असं भारत बायोटेक कंपनीने म्हटलं आहे.

तसेच पत्रकात पुढे असंही म्हटलं आहे की, कोव्हिड-१९ च्या लसीकरण कार्यक्रमात कोव्हॅक्सिन ही एकमेव अॅन्टीकोरोना लस होती. याच्या परिणामांची चाचणी भारतामध्येच करण्यात आली.

AstraZeneca च्या कबुलीने नागरिकांमध्ये घबराट

कोव्हिशिल्ड लस बनवणाऱ्या कंपनीने काही दिवसांपूर्वीच या लसीचे साइड इफेक्ट होतात हे कबूल केलं आहे. त्यामुळे भारतात ही लस अनेकांनी घेतल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. साइड इफेक्टमध्ये थ्रोम्बोसिस आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया होण्याचा धोका असतो. म्हणजेच रक्ताच्या गाठी होत असतात. मात्र ही लक्षणे फारच दुर्मिळ असून एक कोटींमध्ये १२ व्यक्तींनाच असं होऊ शकतं असं कंपनीने म्हटलं आहे.

Covaxin
Pune Corona Virus : पुण्यातील मुळशीत कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटचा शिरकाव, एक रुग्ण आढळल्याने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com