JN.१ Corona New Variant: काळजी घ्या, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, २४ तासात इतक्या रुग्णांची झाली नोंद

JN.१ Corona New Variant Update: राज्यात कोरोनाने पु्न्हा डोकं वर काढलं असून आज १११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशानाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात आता कोरोना रुग्णाची संख्या ९११ वर पोहोचली असून त्यात JN.१ चे १३९ रुग्णांचा समावेश आहे.
JN.१ Corona New Variant
JN.१ Corona New VariantSaam Digital
Published On

JN.१ Corona New Variant

राज्यात कोरोनाने पु्न्हा डोकं वर काढलं असून आज १११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशानाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात आता कोरोना रुग्णाची संख्या ९११ वर पोहोचली असून त्यात JN.१ चे १३९ रुग्णांचा समावेश आहे. वाढत्या थंडीमुळे ताप सर्दी, खोखल्याच्या रुग्णामध्ये वाढ झाली आहे. यातूनच कोरोनाचे रुग्ण वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.१७ टक्के आहे. तर मृत्यूदर १.८१ टक्के आहे. दरम्यान आज १३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज आज १०, ४१५ कोविडच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात RT-PCR १६६५, RAT-८७५० चाचण्यांचा समावेश आहे. आजचा कोरोना पॉझिटिव्ह दर १.०६ टक्के इतका कमी आहे. सध्या राज्यात JN.१ च्या १३९ रुग्णांची नोंद झाली आहे.   

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

JN.१ Corona New Variant
Maratha Reservation: मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडली, या जिल्ह्यात मोडी लिपीत आढळला पुरावा

१ जानेवारी २०२३ पासनू आजपर्यंत १४१ कोरोना रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. त्यापैकी ७०.९२ टक्के रुग्ण ६० वर्षांवरील आहेत.तर ८४ % रुग्णांना इतर आजार होते. कोणताही आजार नसलेल्या १६ % रुग्णांचा कोरोनाने मृ्त्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ९११ नोंद झाली आहे. तर ८७० (९५.५%) रुग्ण गृह विलगिकरणात, ४१ (४.५ %) रुग्णालयात त्यातील १२ (१.३%) रुग्ण ICU आहेत. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. स्वच्छता राखणे, शंका वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

JN.१ Corona New Variant
Tiger Attack : कापूस वेचणी करत असताना वाघाचा हल्ला; महिलेचा मृत्यू, अहेरी तालुक्यातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com