PM Jan Dhan Accounts : 50 कोटी लोकांनी उघडलेलं जन धन खाते नेमके आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jan Dhan Scheme Crosses 50 Crore Accounts : देशातील जनधन खात्यांच्या संख्येने ५० कोटींचा विक्रमी आकडा पार केला आहे.
PM Jan Dhan Accounts
PM Jan Dhan AccountsSaam tv
Published On: 

PM Jan Dhan Yojana : देशातील नागरिकांना बँकिग सेवेशी जोडण्यासाठी २०१४ मध्ये सुरु करण्यात आलेली पीएम जन धन योजना. या अंतर्गत खातेदारांची संख्या ५० कोटींच्या पुढे गेली आहे. देशातील जनधन खात्यांच्या संख्येने ५० कोटींचा विक्रमी आकडा पार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी याचे कौतुक करत हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. ५० कोटी जनधन खात्यांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त खाती ही महिलांची आहे. असे मोदींनी ट्विट करुन सांगितले.

PM Jan Dhan Accounts
Fixed Deposit Scheme : FD पेक्षा जास्त व्याज मिळवा, पैसेही सुरक्षित राहतील

शुक्रवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले की, देशातील एकूण जनधन खात्यांची संख्या ही ५० कोटींच्या पुढे गेली असून त्यापैकी ५६ टक्के खाती ही महिलांची आहे. मंत्रालयाने असे देखील एका निवेदनात म्हटले की, यापैकी सुमारे ६७ टक्के खाती ही ग्रामीव व त्याहून निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत.

1. महिलांचा मोठा वाटा

पंतप्रधान म्हणाले की, निम्म्याहून अधिक खाती ही महिलांची असल्यामुळे अतिशय आनंद होत आहे. या महिलांना लाभ मिळेल याची देखील आम्ही विशेष काळजी घेत आहोत. आर्थिक समावेश आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचायला हवे असे देखील त्यांनी सांगितले

PM Jan Dhan Accounts
Post Office Schemes: पोस्ट ऑफिसची धडाकेबाज योजना! महिन्याला 5000 रुपये जमा करा, इतक्या दिवसात मिळणार 8 लाखांहून अधिक रुपये...

2. त्यामुळे अनेक कोटी रुपये जमा आहेत

वित्त मंत्रालयाने सांगितले की, जन धन खात्यातील एकूण ठेवी 2.03 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. या खात्यांमधून सुमारे 34 कोटी रूपे कार्ड विनामूल्य जारी करण्यात आले आहेत. मोदी सरकारने 2014 मध्ये आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी जन धन बँक खाती उघडण्यासाठी ही मोहीम राबवली. गरिबांना लाभ मिळावा यासाठी अनेक आर्थिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात हा यामागचा उद्देश होता.

3. या सुविधा उपलब्ध आहेत

प्रत्येक कुटुंबातील दोन सदस्य झिरो बॅलेंसमध्ये जन धन खाते उघडू शकतात. जन धन खाते योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सुविधा देण्याचे काम करण्यात आले. जन धन खात्यात पैसे (Money) जमा किंवा काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या खात्यांमध्ये कोणतेही शुल्क न घेता फंड ट्रान्सफर (Transfer) केले जाते आणि मोबाईल बँकिंग सुविधा देखील कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहे.

PM Jan Dhan Accounts
Bank FD Schemes Updated (Aug 2023) : बँकेत एफडी करण्याचा विचार करताय? हीच ती योग्य वेळ!

4. जन धन खात्याचे प्रमुख फायदे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जन धन खात्यांसह सर्व मूलभूत बचत बँक ठेव खातेधारकांना कोणतीही किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही. या योजनेंतर्गत सरकार लोकांना विविध आर्थिक उत्पादने आणि सेवा अतिशय स्वस्त दरात पुरवते. या योजनेंतर्गत सरकार लोकांना विविध आर्थिक उत्पादने आणि सेवा अतिशय स्वस्त दरात पुरवते. इतकेच नाही तर जन धन खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शिष्यवृत्ती, अनुदान, पेन्शन आणि कोविड रिलीफ फंड थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात.

PM Jan Dhan Accounts
Famous Travel Places In Vasai : मुंबईजवळच्या निसर्गात हरवून जायचंय; वसईतील पर्यटनस्थळे घालतील भुरळ!

5. खाते कोण उघडू शकते?

  • या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही बँकेत खाते नसलेली व्यक्ती खाते उघडू शकते.

  • 10 वर्षांवरील अल्पवयीन मुले देखील या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

  • तुमचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास, https://pmjdy.gov.in/home येथून फॉर्म डाउनलोड करू शकतात.

  • यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड, पासपोर्ट आणि पॅन यांसारख्या कागदपत्रांसह कोणत्याही बँकेच्या जवळच्या शाखेत जा.

  • भरलेल्या फॉर्म आणि कागदपत्रांच्या मदतीने जन धन खाते उघडता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.