

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात मतदानादरम्यान राडा
15 मतदान केंद्रांवर तणावाची स्थिती
टीएमसी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील दोन विधानसभा जागांवरील १५ केंद्रांवर सुरू फेरमतदान सुरू आहे. या मतदानादरम्यान काही ठिकाणी टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि सुरक्षा दलांमध्ये शाब्दिक वाद झाला. तर रहिवाशांनी टीएमसी नेत्यांनी रहिवाशांना धमक्या दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या राड्यादरम्यान नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये बराच वेळ वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. परंतु परिसरात तणावाची स्थिती कायम आहे. दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान पार पडले. या निवडणुकांची मतमोजणी आता ४ मे रोजी होणार आहे.
पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील दोन विधानसभा जागांवरील १५ केंद्रांवर सुरू असलेल्या फेरमतदान प्रक्रियेदरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ३७ टक्के मतदान झाले होते. मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ आणि डायमंड हार्बरमधील चार मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. मात्र काही ठिकाणी वाद झाला आहे. टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने एक दिवस आधी या मतदारसंघांमध्ये फेरमतदानाचे आदेश दिले होते. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ३६.९९ टक्के मतदान झाल्याची नोंद झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मगराहाट पश्चिममध्ये ३८.२ टक्के आणि डायमंड हार्बरमध्ये ३५.९२ टक्के मतदान झाले. "आतापर्यंत मतदान शांततेत पार पडले आहे.दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये हिंसाचार किंवा अशांततेची कोणतीही घटना घडल्याचे वृत्त नाहीये," असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही मतदारसंघांमध्ये पुरेसे केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहेत. वेबकास्टिंगही सुरू असून आम्ही संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मगराहाट पश्चिम मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे मोहम्मद समीम अहमद मोल्ला यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार गौर सुंदर घोष निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसचे अब्दुल मजीद हल्दर आणि इंडियन सेक्युलर फ्रंटचे (आयएसएफ) अब्दुल अझीझ अल हसन हे देखील रिंगणात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.