Shocking : आमदाराच्या कारवर बॉम्बहल्ला; जीव थोडक्यात वाचला; राजकीय वर्तुळात खळबळ

saokat molla news : तृणमूल काँग्रेसच्या आमदाराच्या कारवर बॉम्ब फेकले. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
saokat molla news
saokat molla Saam tv
Published On
Summary

पश्चिम बंगालमध्ये आमदाराच्या कारवर बॉम्बहल्ला

शौकत मोल्ला यांचा थोडक्यात जीव वाचला

घटनास्थळी सापडले जिवंत बॉम्ब

आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधीच राजकारण तापलं आहे. दक्षिण २४ परगनाच्या भांगड भागातील तृणमूल काँग्रेसचे आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब फेकल्याचे समोर आलं आहे. पोलरहाट बाजारातून परतताना त्यांच्या कारवर हल्ला केल्याचे समोर आलं आहे. कारवर हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

saokat molla news
लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत मोल्ला यांच्या कारवर रात्री उशिरा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा थोडक्यात जीव वाचला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलरहाट पोलीस स्टेशनजवळील शेताजवळ जिवंत बॉम्ब आढळले. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॉम्बशोधक पथकच्या मदतीने बॉम्ब ताब्यात घेऊन नष्ट केले.

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एकीकडे शौकत मोल्ला यांना आधीच सरकारी सुरक्षा आहे. त्यात हल्ल्ला झाल्याने पोलीस प्रशासनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. पोलिसांनी आता शौकत मोल्ला यांच्या विधानसभा मतदारसंघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

saokat molla news
अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर

तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे की, हल्ल्यामागे आयएसएफचा पाठिंबा असलेल्या समाजकटंकांनी हल्ला केला आहे .शौकत मोल्ला यांनी सांगितलं की, 'मी तृणमूल नेते खैरुल इस्लाम यांना भेटायला गेलो होतो. त्यांना भेटून घरी परतताना माझ्या कारवर हल्ला केला'. त्यांनीही यामागे आयएसएफ संघटनेचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाआहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com