पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचा 'खेला होबे'; आणखी एका खासदाराने सोडली साथ, ७ दिवसात तिसरा राजीनामा

MP Resignation : ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला आणखी एक धक्का बसला आहे. एका आठवड्यात आणखी एका एका राज्यसभा खासदाराने राजीनामा दिल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात खबळबळ उडाली आहे.
MP Resignation :
Tmc Faces Another Setback: Third Rajya Sabha Mp Resigns Amid Political Turmoilsaam tv
Published On
Summary
  • टीएमसीच्या आणखी एका राज्यसभा खासदाराने राजीनामा दिला.

  • गेल्या आठवड्यातील हा तिसरा मोठा राजीनामा असल्याने पक्षात खळबळ.

  • सुष्मिता देव यांच्यानंतर आणखी दोन खासदारांनी साथ सोडल्याची चर्चा.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर टीएमसीला धक्क्यांवर धक्के लागत आहेत. एक-एक करून पक्षातील नेते ममता बॅनर्जी यांची साथ सोडू लागले आहेत. त्याच दरम्यान टीएमसी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच दरम्यान ममता बॅनर्जी यांना अजून एक धक्का लागला आहे. प्रकाश बरेक यांनीही आज राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. गेल्या आठवड्याभरात हा तिसरा राजीनामा आहे. बुधवारी सुष्मिता देव यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. टीएमसीचे राज्यसभेत एकूण १३ खासदार होते. आता तिसऱ्या खासदाराने राजीनामा दिल्यानं टीएमसीकडे १० खासदार राहिलेत. पुढील काही दिवसात अजून काही खासदारही आपला राजीनामा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

लोकसभेत संख्या होणार कमी

लोकसभा खासदारांमध्येही बंडखोरी होत असून २० खासदारांनी वेगळा ग्रुप बनवला आहे. यात युसूफ पटाण, सायोनी घोष, शताब्दी रॉय, काकोली घोष दस्तीदार आदी खासदारांच्या नावाचा समावेश आहे. इतकेच नाही तर काकोली घोष यांनी एनडीएला समर्थन देण्याची घोषणा केली असून त्या लोकसभा अध्यक्षांना तसे निवदेन देणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांचा निकाल जाहीर केल्यानंतर टीएमसीनं ८० जागांवर विजय मिळवला होता.

MP Resignation :
भाजपचं टेन्शन वाढणार, २८ खासदार असलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

दरम्यान स्वत: ममता बॅनर्जी या सुद्धा पराभूत झाल्या होत्या. यासाठी पक्षानं आपल्या दोन आमदारांवर पराभवाचं खापर फोडलं. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाविरुद्धात कारवाई केल्याप्रकरणी रिताब्रता बनर्जी आणि संदीपन साहा यांचे पक्षातून निलंबित केलं. निलंबनाच्या कारवाईनंतर रिताब्रता बनर्जी आणि संदीपन साहा यांनी बंड पुकारत ६० आमदारांना सोबत घेऊन एक गट तयार केला. आता या बंडखोर आमदारांची संख्या ६४ वर पोहचली आहे.

MP Resignation :
अवघ्या काही तासातच बंडखोर आमदारांच्या गटात फूट; राज्यातील राजकारण फिरलं!

काँग्रेसमध्ये विलीन होणार

ममता बॅनर्जी त्यांचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला आल्या होत्या. याच काळात खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांची भेट घेतली; या भेटीमुळे काँग्रेसने टीएमसीसमोर विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवला असावा, अशी सध्या चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com