

पश्चिम बंगालमध्ये २ मे रोजी दोन विधानसभा मतदारसंघांतील १५ केंद्रांवर फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण २४ परगण्यातील मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ केंद्रे आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील ४ केंद्रांवर २ मे रोजी फेरमतदान घेण्यात येईल.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षकांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे १५ केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात होईल. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
४६ - उत्तर येअरपूर एफपी स्कूल खोली क्रमांक २
१२६ - नजरा एफपी स्कूल खोली क्रमांक १
१२७ - नजरा एफपी स्कूल खोली क्रमांक २
१२८ - देउला एफपी स्कूल खोली क्रमांक १
१४२ - घोला नयापारा गर्ल्स हाई मदरसा खोली क्रमांक २
२१४ - एकतारा मालय एफपी स्कूल खोली क्रमांक १
२१५ - एकतारा मालय एफपी स्कूल खोली क्रमांक २
२१६ - एकतारा मालय धोडा एफपी स्कूल खोली क्रमांक १
२३० - बाहिरपूर कुरकुरिया एफपी स्कूल खोली क्रमांक १
२३१ - बाहिरपूर कुरकुरिया एफपी स्कूल खोली क्रमांक २
२३२ - बाहिरपूर कुरकुरिया एफपी स्कूल खोली क्रमांक ३
११७ - बागदा ज्युनिअर हायस्कूल
१७९ - चंदा एफपी स्कूल खोली क्रमांक २
१९४ - हेंडेयपूर एफपी स्कूल
२४३ - रायनगर एफपी स्कूल खोली क्रमांक २
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.