पश्चिम बंगाल निकालाआधीच आला ममता बॅनर्जींचा 'एक्झिट पोल', देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारा अंदाज

Mamata Banerjee Exit Poll claim TMC 226 seats : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं असून, एक्झिट पोलचे अंदाजही जाहीर झाले आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निकालांआधी खळबळजनक दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोणाचं सरकार येणार?
Mamata Banerjee/Social Mediasaam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालांचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळाच अंदाज बांधला आहे. तृणमूल काँग्रेसची बंगालमध्ये सत्ता येणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. याशिवाय तृणमूल किती जागा जिंकणार, याचा आकडाही सांगितला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात २३ एप्रिलला १५२ जागा, तर २९ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. विधानसभा निवडणुकांच्या दोन्ही टप्प्यांत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. राज्याच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंतचं हे सर्वाधिक मतदान आहे.

मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज आले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर, म्हणजेच भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज आहे. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची घसरण झाल्याचे दाखवण्यात आले. एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी निवडणूक निकालाबाबत मोठा दावा केला आहे.

ममता बॅनर्जींचा दावा काय?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी निकालाबाबत मोठा दावा केला आहे. मतमोजणीआधीच ममता बॅनर्जी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत २२६ हून अधिक जागांवर विजय मिळेल. बंगालमध्ये मां-माटी-मानुषचं सरकार येणार आहे, असं त्या म्हणाल्या. केंद्रानं आपली पूर्ण यंत्रणा वापरली. पण विजय आपलाच होणार आहे. १९ राज्यांमधून भाजपचे नेते बंगालच्या जनतेला भीती दाखवण्यासाठी आले होते, असा आरोपही ममतांनी केला.

एक्झिट पोलचा अंदाज काय?

मतदानानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. मॅटेराइजच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला पश्चिम बंगालमध्ये १४६ ते १६१ जागांवर विजय मिळणार असून, सरकार स्थापन करू शकतात. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला १२५ ते १४० जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोणाचं सरकार येणार?
West Bengal Elections : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदान होणार? अनेक बूथवरील EVM वर टेप लावल्याच्या तक्रारी, ECकडून गंभीर दखल

दरम्यान, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या २९४ जागा आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी १४८ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे.

पश्चिम बंगालमध्ये कोणाचं सरकार येणार?
Mamata Banerjee : मुख्यमंत्री लोकशाही धोक्यात घालत आहेत; ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने फटकारले, ते प्रकरण नेमकं काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com