Ration Card : मोठी घोषणा! 'या' ६३ लाख नागरिकांचे रेशन कार्ड होणार रद्द; कुठे लागू करण्यात आला हा निर्णय?

West Bengal Ration Card Update : पश्चिम बंगाल सरकारने अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. रेशन कार्ड पडताळणी मोहिमेत सुमारे ६३ लाख रेशन कार्डे रद्द होण्याची शक्यता आहे.
WEST BENGAL GOVERNMENT TO CANCEL 63 LAKH RATION CARDS, VERIFICATION DRIVE BEGINS
WEST BENGAL GOVERNMENT TO CANCEL 63 LAKH RATION CARDS, VERIFICATION DRIVE BEGINSSaam Tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

  • सुमारे ६३ लाख रेशन कार्डे रद्द होणार

  • खाद्य साथी योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी जाणार

  • गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार रोखणे हा सरकारचा प्रमुख उद्देश

अलीकडेच पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडून सरकार स्थापन करण्यात आलं. यानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून लाखो रेशन कार्डांची छाननी सुरू करण्यात आली असून, अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे ६३ लाख नागरिकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व पुरवठा विभागाच्या ‘खाद्य साथी’ योजनेअंतर्गत मोफत आणि सरकारी धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. या पडताळणीत नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या व्यक्तींना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारी तिजोरीवरील वाढता आर्थिक भार कमी करणे आणि विविध योजनांमधील गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचाराला आळा घालणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

WEST BENGAL GOVERNMENT TO CANCEL 63 LAKH RATION CARDS, VERIFICATION DRIVE BEGINS
Monsoon Rain Alert : महाराष्ट्रात काही तासांत मान्सूनची एंट्री, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

अन्न आणि पुरवठा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, SIR प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांची रेशन कार्डे रद्द केली जाणार आहेत. या प्रक्रियेत मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या लाखो नागरिकांची माहिती तपासली जात असून, त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

WEST BENGAL GOVERNMENT TO CANCEL 63 LAKH RATION CARDS, VERIFICATION DRIVE BEGINS
Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

मात्र, सरकारने काही नागरिकांना दिलासा देखील दिला आहे. ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, परंतु त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, अशा व्यक्तींची रेशन कार्ड अंतिम निर्णय होईपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना कोणताही फटका बसणार नाही. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. दुसरीकडे, या कारवाईमुळे ६३ लाख नागरिकांना मोठा धक्का बसणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com