दिल्ली-एनसीआरमध्ये ३ मार्च रोजी हलका पाऊस होण्याची शक्यता वळवण्यात गाली आहे. येथील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान दिवसभर १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, ३ मार्च रोजी सकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागात बर्फवृष्टी सुरूच आहे. त्याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या मैदानी भागात दिसून येत आहे. येथे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. पुढील काही तासांत हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या विविध भागात सुमारे ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि पाऊस पडेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हवामान खात्याने सांगितलं आहे की, शनिवारी एनसीआरमध्ये कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस होते. तसेच गेल्या २४ तासांत दिल्लीच्या विविध भागात २ मिमी पाऊस झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते ५.३० दरम्यान पुसा परिसरात २.५ मिमी पाऊस झाला. दुपारी येथे ताशी ३० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. (Latest Marathi News)
तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ३ मार्च रोजी सिक्कीम आणि नागालँडमधील काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. याशिवाय पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.