Lok Sabha Election 2024: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांपासून अंतर! साध्वी प्रज्ञा, बिधुरी यांचं तिकीट कापलं; BJP ब्रिजभूषण यांना संधी देणार का?

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत १९५ नावांचा समावेश आहे. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहे.
BJP candidates first List for Lok Sabha Election 2024
BJP candidates first List for Lok Sabha Election 2024Saam Tv
Published On

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024:

भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत १९५ नावांचा समावेश आहे. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहे. यामध्येच रमेश बिधुरी आणि प्रज्ञा चौधरी यांचं तिकीटही कापण्यात आलं आहे. हे दोन्ही खासदार आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात.

त्यांना तिकीट न देऊन भाजपने मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. यातच खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना यावेळी भाजप संधी देणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. कारण पहिल्या यादीत भाजपने अशा खासदारांची तिकिटे कापलेली दिसतात, जे कोणत्याना कोणत्या वादात अडकले होते. यातच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचं आरोप केला होता. यासाठी महिला कुस्तीपटूंनी आंदोलनही केलं होतं. यावेळी त्यांचंही तिकीट कापलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: भाजपने दिल्लीत प्रवेश वर्मा यांच्यासह 4 उमेदवारांचं कापलं तिकीट, मनोज तिवारी यांना पुन्हा संधी

रमेश बिधुरी हे दक्षिण दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत. पक्षाने त्यांचं तिकीट कापून येथून रामबीर सिंह बिधुरी यांना मैदानात उतरवलं आहे. रमेश बिधुरी यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लोकसभेच्या कामकाजादरम्यान बसपा खासदार दानिश अली यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर सभापती ओम बिर्ला यांनी बिधुरी यांना कडक ताकीद देत भविष्यात सावध राहण्यास सांगितले होते.  (Latest Marathi News)

साध्वीच्या जागी आलोक शर्मा यांना संधी

रमेश बिधुरी यांच्याशिवाय भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांचेही तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञा यांनीही अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटात त्या आरोपीही होत्या. असे असतानाही भाजपने त्यांना २०१९ मध्ये भोपाळमधून तिकीट दिले होते.

BJP candidates first List for Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : PM मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 195 जणांना मिळालं तिकीट

दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत काही अशी नावेही आहेत, ज्यांच्या वक्तव्यामुळे वाद झाले होते. मात्र त्यांना भाजपने संधी दिली आहे. या नावांमध्ये अजय टेनी, साक्षी महाराज, कृपाशंकर सिंह यांचा समावेश आहे. टेनी यांच्यावर थेट आरोप नसल्याने त्यांचं तिकीट कापलं नसल्याचं जाणकारांचे मत आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध खटला सुरू आहे. त्याचबरोबर साक्षी महाराज यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com