Weather Forecast: ऐन उन्हाळ्यात कोसळणार पावसाच्या सरी; येत्या २४ तासांत 'या' भागात पावसाची शक्यता

IMD Rain Alert: रणरणते उन, उकाडा आणि घामाच्या धारा, असे वातावरण असतानाच हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Weather Update 5th April 2024
Weather Update 5th April 2024 Saam TV

Weather Update 5th April 2024

रणरणते उन, उकाडा आणि घामाच्या धारा, असे वातावरण असतानाच हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Update 5th April 2024
RBI Action: भारतीय रिझर्व्ह बँकेने १० बँकांना ठोठावला लाखो रुपयांचा दंड; ग्राहकांवर काय होईल परिणाम?

उत्तर-पश्चिम आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागातही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रावर तयार झालेल्या चक्रवात स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीवर तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील तापमान (Weather) चाळीशी पार गेलंय. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने पुढचे १५ दिवस देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे काही राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?

येत्या २४ तासांत महाराष्ट्र, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. उत्तर-पश्चिम आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update 5th April 2024
Heatwave Warning : उष्माघातापासून कसा कराल स्वत:चा बचाव? काय आहेत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com