Chhattisgarh New CM: अखेर ठरलं! छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा; कोण आहेत विष्णू देव साय?

Vishnu Deo Sai Chhattisgarh New CM: राज्यातील सर्वात मोठा आदिवासी चेहरा मानल्या जाणाऱ्या विष्णुदेव साय यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Chhattisgarh New CM
Chhattisgarh New CMSaamtv
Published On

Chhattisgarh New CM:

अखेर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपली आहे. भाजपकडून छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठा आदिवासी चेहरा मानल्या जाणाऱ्या विष्णुदेव साय यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) घवघवीत यश मिळवले. राजस्थान, मध्यप्रदेश सह छत्तीसडमध्येही भाजपने सत्ता खेचून आणली. निवडणूकीतील विजयानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता लागली होती.

अखेर सात दिवसानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आदिवासी समुदायातून येणारे विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळताना दिसतील. आदिवासी समाजाचा योग्य सन्मान केला जाईल, असे भाजपने याआधीच स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे भाजपकडून राज्यात सर्वात मोठा समुदाय असलेल्या आदिवासींचा विचार करत हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh New CM
BJP NCP Controversy : राष्ट्रवादी अजित पवार गट व सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावरील नावावरून नाराजी

अमित शहांनी शब्द पाळला..

विष्णू देव साई हे (Vishnu Deo Sai) कुंकरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आमदार झाले आहेत. तसेच ते रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदारही आहेत.विष्णुदेव साई हे छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांच्यासाठी कुंकरी येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी तुम्ही साईंना आमदार केले तर मी मोठा माणूस बनवीन... असे आश्वासन दिले होते. (Latest Marathi News)

Chhattisgarh New CM
Chhattisgarh Accident: सुखी संसार सुरू होण्याआधीच सर्व संपलं! लग्नाहून परतताना भीषण अपघात; नवरा नवरीसह ५ जणांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com