शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज सोलापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या दौऱ्यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी- शहांवर सडकून टिका केली. तसेच राष्ट्रवादी अन् शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते कधीही शक्य होणार नाही.. असेही ते म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
2024 साली सोलापूरचं (Solapur) राजकीय चित्र बदलेल असेल. राज्यातलं राजकारण राजकारण राहिले नाही. या राज्याने अनेक प्रमुख नेते पाहिले. पणं इतकं सुडाचं, बदल्याचं आणि बदनामीचं राजकारण या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये पाहिले नाही. हे गेल्या १० वर्षात सुरू झालं. असे संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
तसेच "मराठा - ओबीसी आरक्षण हे भाजपचेच कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अशा घाणेरड्या राजकारणाची दशकपुर्ती झाली आहे. रावणाची जशी १० तोंडे उडवली गेली. तशी यांचीही उडवली जातील. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती. बाळासाहेबांचीच राहिलं. इलेक्शन कमिशनला ज्यांची गुलामी करायची आहे त्यांची करावी..." असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"भाजप (BJP) ही ढोंगी पार्टी आहे हे सर्वांना माहितीय, ती एक टोळी आहे. अटल बिहारी वाजपयी आणि अडवाणी असताना राजकीय विचारधारा असणारी पार्टी होती ही मोदी - शहा यांची टोळी आहे. जोपर्यंत मोदी - शहा आहेत तोपर्यंत लोकशाहीसाठीचे निर्णय मान्य होणार नाहीत..." असे म्हणत अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) संजय राऊतांनी घणाघाती टीका केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.