Viral Video: अरेरे! शॉर्ट ड्रेसने दिला धोका, तरुणीची झाली मोठी फजिती, डान्स करायला गेली अन् Video व्हायरल

नाचता नाचता या तरुणीची अशी फजिती झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video News
Viral Video NewsSaamtv
Published On: 

Viral Dance Video: सध्याचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये कधी धमाकेदार डान्स पाहायला मिळतो तर कधी एखादा देसी जुगाड पाहायला मिळतो.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शॉर्ट ड्रेस घालून डान्स करणाऱ्या तरुणीची झालेली फजिती पाहायला मिळत आहे. (Viral Video)

Viral Video News
Shubhman Gill: पोरींचा दावा, शुभमन गिलचं हवा! नागपुरच्या चौकाचौकात लागले बॅनर; नेमकी भानगड काय?

आजकाल मुली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल ड्रेस घालताना दिसतात. पबमध्ये, क्लबमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये छोटे कपडे घालून या मुली मिरवताना दिसतात. मात्र अशा फॅशनमुळे कधी कधी सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमात मोठी पंचाईत होते. सध्या एका तरुणीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये तरुणी डान्स करता करता शॉर्ट ड्रेसमुळे जोरात आपटल्याची पाहायला मिळत आहे.

Viral Video News
बॅंन्ड बाजा बारात! ना घोडा, ना गाडी, भावाने काढली थेट जेसीबीमधून वरात; Video होतोय तुफान व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नाईट क्लबमध्ये अनेक तरुण तरुणी डान्स करत आहेत. एक पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेली तरुणी मोठ्या उत्साहात नाचत आहेत. काही तरी वेगळा डान्स करण्याचा नादात तिच्या सोबत जे होतं ते एकदम धक्कादायक असतं.

व्हिडिओमध्ये तरुणी नाचत असतानाच अचानक तिचा ड्रेस पाठीमागून फाटतो, आणि ती जोरात आपटते. तरुणीची ही तारांबळ पाहून तिथे उभे असलेले तरुणही जोरजोरात हसताना दिसत आहेत.

या तरुणीच्या फजितीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परदेशातील क्लबमधील हा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे. फ्लेक्सिब्लिटी ट्रेनिंग या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com