Viral News: नोकरी मिळवणं हे सर्वांसाठीच एक आवाहन असतं. खासकरुन तरुण वयात असताना जेव्हा अनुभव नसतो अशा वेळेस नोकरी (Job) मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मुलांसाठी तर अनेक आव्हानं असतात. अशात ती सगळी आव्हानं पार केल्यानतंर जेव्हा नोकरीसाठीच्या मुलाखतीत आपल्या शरीरावरुन आपल्याला जज केलं जातं तेव्हा फार वाईट वाटत. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला त्याच्या स्किल्सपेक्षा, शिक्षणापेक्षा, स्वभावापेक्षा त्याच्या लूकवरुन आणि पर्सनॅलिटीवरुन बघितलं जातं.
चांगला लूक आणि आकर्षक व्यक्तिमत्व नसेल तर त्याला रिजेक्ट केलं जातं. एखाद्याच्या शरीरावरुन त्याला जज करणं नैतिकतः चुकीचंच आहे. मात्र, ब्रिटेनमध्ये एका तरुणानं अजबच दावा केला आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याचा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच त्याचे लिंग हे खूपच मोठे असल्याने त्याला नोकरी नाकारण्यात आली आहे. (Man lost job due to Huge private part)
एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, ब्रिटनमध्ये राहणारा 22 वर्षीय जो (Joe) नावाच्या तरुणाने अलीकडेच त्याच्या हातात येणारी नोकरी गमावली. त्याचे कारण होते जो याचा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच त्याचे लिंग. रिपोर्टनुसार, जोच्या प्रायव्हेट पार्टचा आकार सामान्य माणसांपेक्षा मोठा आहे. या कारणास्तव, जेव्हा तो सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडतो तेव्हा लोकांचे लक्ष त्याच्या पॅंटकडे जाते, ज्यामुळे लोकांना खूप लाज वाटते. लोकांना असे वाटते की जो क्षुब्ध किंवा कामवासनेच्या विचारात आहे, ज्याला सर्वजण वाईट समजतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात. (Britain man private part lost job)
नोकरी गमावल्याने जोच्या बाबतीत सर्वात वाईट घडले. त्याने सांगितले की तो नोकरीसाठी मुलाखत देत होता आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता. आपल्याला ती नोकरी नक्कीच मिळेल अशी आशा होती पण तसे होऊ शकले नाही. मुलाखतीनंतर त्याला सांगण्यात आले की, मुलाखतीदरम्यान त्याचे वर्तन आक्षेपार्ह होते आणि त्याने योग्य कपडे घातले नव्हते. ही नोकरही गमावल्यामुळे जो याला खूप त्रास झाला आणि तो खूप निराश झाला.
त्याचे मित्र आणि काही ओळखीचे लोक त्याला त्याच्या शरीराच्या रचनेमुळे चिडवतात. प्रत्येकालाच वाटतं की आपलं लव्ह लाईफ खूप चांगलं असायला हवं पण तसं नाही कारण त्यांना फक्त दोनच प्रकारच्या मुली मिळतात ज्यांना फक्त आश्चर्यासारखं बघायचं असतं, कोणतंही नातं ठेवायचं नाही आणि दुसरी जी त्यांना थेट नकार देते. त्याने सांगितले की, आपला प्रायव्हेट पार्ट लपवण्यासाठी त्याला स्पेशल अंडरवेअर बनवावे लागते, ज्यामुळे त्याला दर महिन्याला 19 हजार रुपये अंडरवेअरवर खर्च करावे लागतात. असे असूनही, तो विनोदाचा विषय बनतो आणि कधीकधी त्याला घर सोडण्याची लाज वाटते.
जो च्या प्रायव्हेट पार्टचा आकार 9.5 इंच आहे, तर जगातील सर्वात लांब लिंगाचा विक्रम अमेरिकेच्या जोना फाल्कनने (Jonah Falcon) केला आहे, ज्याचा आकार 13.5 इंच आहे. तथापि, या विक्रमाबद्दल काही मतमतांतरे आहेत कारण मेक्सिकोच्या रॉबर्टो एस्क्विवेल कॅब्रेराच्या (Roberto Esquivel Cabrera) याच्या लिंगाची लांबी 18.9 इंच आहे, परंतु त्याला रेकॉर्डसाठी मान्यता मिळालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.