Vinod Tawde, BJP Uttar Pradesh in-charge : आगामी निवडणुका आणि संघटनात्मक फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्य प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर करत भाकरी फिरवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. भाजप हायकमांडने विनोद तावडे यांच्याकडे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश (UP) राज्याची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
याआधी बिहारच्या प्रभारीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या विनोद तावडे यांना देशातील सर्वात मोठ्या राज्याची धुरा दिली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी भाजप नेतृत्वाने तावडेंवर विश्वास दाखवत पक्षांतर्गत त्यांच्या वाढत्या प्रभावावर आणि कौशल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपने ३ प्रमुख राज्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी राज्य प्रभारींची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन राज्य प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राष्ट्रीय मंत्री जगदीश ईश्वरभाई पटेल यांची उत्तर प्रदेशचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार डॉ. सतीश पुनिया यांच्याकडे देण्यात आली आहे. गुजरातमध्ये पक्षाने राष्ट्रीय कार्यालय प्रभारी आणि राज्यसभा खासदार तरुण चुघ यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी
भाजपने राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे सोपवली आहे. तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाने जाहीर केलेल्या नियुक्ती यादीत उत्तर प्रदेशचे प्रभारी आणि सह-प्रभारी या दोघांचीही नावे स्पष्टपणे नमूद आहेत. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू होतील.
नव्या कार्यकरणीत स्थान मिळाल्यानंतर आणखी एक जबाबदारी
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी आपल्या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा केली. त्यांनी आपल्या टीममध्ये अनेक अनुभवी नेत्यांसोबतच नवीन चेहऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. वसुंधरा राजे, राम माधव आणि स्मृती इराणी यांसारख्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या संघटनात्मक भूमिका देण्यात आल्या आहेत. पियुष गोयल यांची राष्ट्रीय खजिनदारपदी, तर बी. एल. संतोष यांची राष्ट्रीय संघटन महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचा हा नवीन संघ संघटनात्मक अनुभव, तरुण ऊर्जा आणि तळागाळातील संबंध यांचा संगम म्हणून सादर करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.