Accident : मध्यरात्री हायवेवर डंपर-पिकअपची जोरदार धडक, ८ जणांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर

Madhya Pradesh accident : मध्य प्रदेशातील भिंड-ग्वालियर महामार्गावर मध्यरात्री डंपर आणि मजुरांनी भरलेल्या पिकअपची भीषण धडक झाली. या अपघातात ८ मजुरांचा मृत्यू, तर ३२ जण गंभीर जखमी झाले.
Madhya Pradesh accident
Madhya Pradesh accidentसाम टीव्ही मराठी
Published On

Madhya Pradesh Bhind Gwalior highway dumper pickup accident : मध्य प्रदेशातील भिंड-ग्वालियर नॅशनल हायवेवर सोमवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. रस्त्यावरील जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात मजुरांनी भरलेली पिकअप गाडी आणि डंपर यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण दुर्घटनेत आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर भात लावणीचे काम आटोपून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी परतत असतानाच त्यांच्यावर हा काळाने घाला घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री १ च्या सुमारास छीमका गावाजवळ घडली. हायवेवर रस्त्याच्या मध्यभागी गाईंचा ताफा बसला होता. त्यांना वाचवण्याच्या नादात वेगात असणाऱ्या पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या डंपरशी तिची जोरदार धडक झाली.

Madhya Pradesh accident
ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आज पुन्हा महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष

सर्व मजूर धान लावणीचे काम आटोपून परतत होते. पिकअपमधील सर्व मजूर उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी जिल्ह्यातील रहिवासी होते. हे सर्व मजूर भात (धान) लावणीचे काम करण्यासाठी मध्य प्रदेशात आले होते. काम पूर्ण करून ते आपल्या गावी परत जात असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला.

Madhya Pradesh accident
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात 'डिप्रेशन'; महाराष्ट्रात हवामान बदलणार, पाहा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस...

अपघाताची माहिती मिळताच गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे पथक स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने गोहद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या मजुरांना पुढील उपचारासाठी ग्वालियरला हलवण्यात आले आहे. मृत मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com