विजय थलपती सध्या गुगल इंडियाच्या टॉप 5 ट्रेंड्सपैकी एक आहेत. विजय यांच्या पक्षाबद्दलची उत्सुकता इतकी होती की, सर्च व्हॉल्यूमच्या बाबतीत त्यांनी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षांनाही मागे टाकले होतं. त्याला कारणही तसंच आहे कारण विजयनं तामिळनाडूचं राजकारण 180 अंशात बदलवून टाकलं. द्रविडीविचारांवर गेल्या ६० - ७० वर्षांपासून द्विपक्षीय राजकारण करणाऱ्यांना घरी बसवून त्यानं द्रविडी विचारांसोबतच तामिळ अस्मिता आणि आधुनिक सामाजिक न्यायाची भूमिका मांडली आणि तीच त्याच्या पथ्यावर पडली. विजयनं तामिळी अस्मितेवर लक्ष्य केंद्रीत करुन सध्या सुरु असलेल्या जाती धर्मांच्या आणि पंथांच्या राजकारणाला तिलांजली दिली. आणि हाच नवा विचार तमिळ जनतेला भावला. तामिळनाडूमधील डीएमके, एआयडीएमके आणि TVKच्या विचारधारेचा आदर्शांचा जर विचार केला तर विजयचा विचार कसा वेगळा ठरता ते पाहूयात.
1.
DMK
कट्टर पेरियारवादी आणि तर्कवादी विचार.
AIADMK
द्रमुकमधून बाहेर पडलेले MGRआणि जयललिताचा करिश्मा आणि कल्याणकारी योजनांचा आधार
TVK
तमिळ राष्ट्रवाद आणि आधुनिक सामाजिक न्याय
2.
DMK
नास्तिकतेचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार. हिंदू धर्मातील रुढींवर टीका.
AIADMK
मवाळ धार्मिक भूमिका, केंद्रात सनातनी पक्षांसोबत आघाडी
TVK
धर्मनिरपेक्ष मानवतावाद, कोणत्याही धर्माचा द्वेष नाही, राजकारण आणि धर्म यांची गल्लतही नाही
3.
DMK
हिंदीला तीव्र विरोध. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी केंद्राशी संघर्ष. कॉग्रेससोबत आघाडी
AIADMK
तमिळ भाषेचा अभिमान, केंद्र आणि राज्यात भाजपसोबत युतीची भूमिका
TVK
तमिळ भाषेला प्राधान्य, देशाच्या अखंडतेशी सुसंगत 'तमिळ राष्ट्रवाद', पण भाजपशी कधीही युती न करण्याची भूमिका
4.
DMK
घराणेशाही आणि सोशल इंजिनिरींगवर भर
AIADMK
मोफत वस्तू आणि थेट लाभ देणाऱ्या सरकारी योजनांवर भर.
TVK
घराणेशाही, भ्रष्टाचार विरोधी, 'मोफत' पेक्षा 'सक्षम' करण्यावर विश्वास.
5.
DMK
पेरियार, अण्णादुराई, करुणानिधींचा विचार
AIADMK
अण्णादुराई, एमजीआर आणि जयललितांचा आदर्श
TVK
पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कामराज यांचा विचार
अशा पद्धतीनं विजयने या दोन्ही पक्षांच्या त्रुटींवर बोट ठेवत व्यापक सामाजिक न्यायाची भूमिका घेत पेरियार यांच्यासोबत आंबेडकरांच्या विचारांना महत्त्व दिलं. जुन्या नेत्यांच्या पारंपरिक राजकारणापरिलकडे जाऊन जात-धर्मात न अडकणाऱ्या न्यू जनरेशन मतदारांना त्याने साद घातली. कट्टर द्रविडी विचार मांडण्याऐवजी त्यानं मवाळ द्रविडी विचार ठेऊन तामिळ राष्ट्रवादाची मांडलेली सर्वधर्मसमभावाची भूमिका मतदारांना पटली आणि त्यामुळेच त्याला भरभरुन मतं मिळाल्याचं दिसतंय. दोन वर्षांपुर्वी उभ्या केलेल्या त्याच्या या पक्षाचा विचार विजयच्या तालुक्या तालुक्यातील फँनक्लबनं जनतेपर्यंत पोहचवला आणि हेच फॅन्स क्लब पक्षाचं कॅडर म्हणून पुढे आले आणि रात्रीतून दक्षिणेतली कॅडरबेस पार्टी जन्माला आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.