काँग्रेसचा वरिष्ठ नेता हरपला; पक्षाला मोठा हादरा

Senior Congress Leader Virendra Chaubey Death News Vishrampur: विश्रामपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र ऊर्फ गामा चौबे यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार वाराणसी येथे पार पडले.
Last respects being paid to veteran Congress leader Virendra “Gama” Chaubey before his final rites in Varanasi.
Last respects being paid to veteran Congress leader Virendra “Gama” Chaubey before his final rites in Varanasi.saam tv
Published On

विश्रामपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र चौबे ऊर्फ गामा चौबे (७२) यांचे मंगळवारी उशिरा संध्याकाळी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने मेदिनीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Last respects being paid to veteran Congress leader Virendra “Gama” Chaubey before his final rites in Varanasi.
Lokmanya Tilak Terminus Fire News | लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कँटीनला भीषण आग

राजकीय प्रवास आणि योगदान

गामा चौबे हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होते. या प्रदीर्घ काळात त्यांनी पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यांच्या निधनामुळे परिसरात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बुधवारी पहाटे वाराणसी येथील गंगा नदीच्या काठी असलेल्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव राजीव चौबे (राजू) यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

Last respects being paid to veteran Congress leader Virendra “Gama” Chaubey before his final rites in Varanasi.
Security Breach in Lok Sabha | लोकसभेतील खासदारांकडून घुसलेल्या तरुणाला चोप

अंत्यसंस्कारापूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते संतोष कुमार चौबे यांनी पक्षाच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर काँग्रेसचा झेंडा) अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या निधनाबद्दल स्थानिक नागरिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com