भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदाराचे निधन; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; राजकीय वर्तुळात शोककळा

Former BJP Rajya Sabha MP Ravindra Kishore Sinha Dies: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार आणि SIS ग्रुपचे संस्थापक रवींद्र किशोर सिन्हा यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पाटणा येथे अंत्यसंस्कार होणार.
Veteran BJP leader Ravindra Kishore Sinha passes away at 75
Veteran BJP leader Ravindra Kishore Sinha passes away at 75saam tv
Published On: 

राजकीय वर्तुळातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार आणि SIS ग्रुपचे संस्थापक रवींद्र किशोर सिन्हा यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. शुक्रवारी नोएडा येथील तयांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तयांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Veteran BJP leader Ravindra Kishore Sinha passes away at 75
२०२९ मध्ये पंतप्रधान कोण? अमित शाहांनी थेट नावाचीच केली घोषणा

आर. के. सिन्हा हे बिहारमध्ये भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. २०१४ ते २०२० या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले होते. राजकारणासोबतच उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी SIS ग्रुप या खासगी सुरक्षा कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी देशातील प्रमुख खासगी सुरक्षा एजन्सींपैकी एक असून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिचा व्यवसाय विस्तारलेला आहे.

Veteran BJP leader Ravindra Kishore Sinha passes away at 75
काहीतरी मोठं घडणार? 12 देशांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, घरात अन्न-धान्य आणि औषध साठवण्याच्या सूचना; जगात खळबळ

पाटणा येथे होणार अंत्यसंस्कार

आर. के. सिन्हा यांचे निधन नोएडा येथील निवासस्थानी झाले. त्यांच्या पार्थिवावर पाटणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी पाटणा येथील त्यांच्या अन्नपूर्णा भवन या निवासस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडून श्रद्धांजली

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आर. के. सिन्हा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी केलेले कार्य, तसेच पत्रकारिता, समाजसेवा आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांचे निधन ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.